पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र या पुण्यामध्ये काही दिवसांपासून तसेच काही वर्षांमध्ये गुंड तयार होत आहेत. तर टोळी युद्धात कधी कधी आपलाच जीव गमावताना दिसत आहेत. अशातच आता पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे गजानन मारणे (गजा मारणे) (Gajanan Marne) आहे. यांच्या घरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार (parth pawar) यांनी जाऊन भेट घेतली आहे. यामुळे आता पुण्यातील राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. गजानन मारणे यांनी पार्थ पवार घरी पोहोचताच पुष्पगुच्छ देत सत्कार केला आहे. यावेळी त्यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली असणार याबाबत मोठी अपडेट अजून समोर आली नाही. मात्र काहीना काही राजकीय हालचाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पार्थ पवार हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उमेदवार होते. मात्र पार्थ पवारांची ताकद कमी पडल्याने पार्थ पवारांचा पराभव झाला आहे. तसेच आता पार्थ पवार पुण्यामध्ये कोथरूड मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी गजा मारणे यांची भेट घेतली. गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दीड वर्षांआधी पक्षप्रवेश केला. त्याआधी त्या मनसेमध्ये होत्या. त्यांनी मनसे पक्षामध्ये असताना नगरसेवक म्हणून काम केलं. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयश्री मारणे आणि पार्थ पवार यांच्यातील भेटीमुळे राजकीय वर्तुळात ट्विस्ट घडण्याची शक्यता आहे.
Goon Gajanan Marne’s Meeting with Parth Pawar Sparks Political Speculation in Pune
https://t.co/HmX8R50QEt— Punekar News (@punekarnews) January 25, 2024
हे ही वाचा
‘मीरा रोडवर फिरवलेला बुलडोजर म्हणजे राजकारण’
नाशिकमध्ये दोन दिवसात एक लाख घरांचे सर्वेक्षण
भाजपचे मुंबईवर अतिक्रमण, शिवसेनेच्या बैठकीत संताप !
कोण आहेत गजा मारणे?
गजानन मारणे हे पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील मोठं नाव आहे. मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गजानन मारणेची ओळख आहे. कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरामध्ये आल्यापासून गुन्हेगारी सत्र सुरू असल्याच्या चर्चा आहेत. मारणे टोळीवर २३ हून अनेक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर ६ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणे हा गेली ३ वर्षांपासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये होता. व्यापाऱ्याला २० कोटी खंडणी मागीतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.