26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीय...असे होत राहिले तर हळूहळू महाराष्ट्र खिळखिळा होईल: आमदार भास्कर जाधव

…असे होत राहिले तर हळूहळू महाराष्ट्र खिळखिळा होईल: आमदार भास्कर जाधव

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक बडे प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात चांगलेच रान उठवले होते. दरम्यान आता केंद्र सरकारने मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्याची बातमी मिळताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. आज केंद्र सरकारने वस्त्रोद्योग आयुक्तांना मुंबईचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचे निर्देश दिले. हाच धागा पकडत (भाजप) मोदी सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) म्हणाले की, उद्या नवीन वर्ष गुढी पाडवा आपण साजरा करणार आहोत. चैत्र महिन्यात असणारे हे नवीन वर्ष आहे. आपल्या हातून चांगले काम व्हावे, आपल्या कुटुंबाचे, जिल्ह्याचे नाव मोठे व्हावे हीच इच्छा असते मात्र टेक्सटाइलचे कमिशनर ऑफिस दिल्लीला जात असल्याचे समजताच धक्का बसला.

मुंबई ही गिरणी कामगारांची आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस होत आहे. याला उभारी द्यायची गरज होती. 2014 नंतर महाराष्ट्रातील अनेक उद्योग, महत्वाची कार्यालये गुजरातमध्ये गेली. टेक्सटाइल ऑफिस हे जर दिल्लीला नेले जात असेल तर हळूहळू महाराष्ट्र खिळखिळा होईल. विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात आहे, निसर्ग कोपाने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सभागृहात मी पुन्हा आता येणार नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे हे अपेक्षा असते. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कोकणात फार मोठी आपत्ती आली. शेतकरी उध्वस्थ झाला पण ते कधी आत्महत्या करत नाहीत. त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यासाठी सरकारने एक गट नेमावा. जेणे करून त्याची मदत विदर्भ व मराठवाड्यासाठी होईल. नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणे यांच्यावर मी काही बोलत नाही. राज्यात, केंद्रात तुमचे सरकार असताना असे आक्रोश मोर्चे तुम्हाला काढावे लागत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय यांचे हिंदुत्व लंगडे झाले आहे. बाळासाहेब ठाकरे शिवाय यांचे (विरोधकांचे) हिंदुत्व नकली आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे जे काही बोलायचे होते ते बोलून गेले. एकत्र निवडणुका घ्यायला भाजपला कोणी विरोध केला आहे. आजच एकत्र निवडणुका घ्या, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा :

मुंबईची आर्थिक सत्ता उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाड कडाडले

शंभर बापांचा नसशील, तर माझ्यावरचा एक तरी आरोप सिद्ध करून दाखव ; भास्कर जाधवांचे मोहित कंबोजना आव्हान

VEDIO : तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही ; भास्कर जाधव यांचा एकनाथ शिंदे गटाला टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी