29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयमनसे नेते संदीप देशपांडे संतापले, शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा केला निषेध

मनसे नेते संदीप देशपांडे संतापले, शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा केला निषेध

टीम लय भारी

मुंबई: शिवाजी पार्क मैदानात माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारक ते उद्यान गणेश मंदिरापर्यंतच्या मोठ्या पट्ट्यात मैदानाच्या मधोमध पालिकेतर्फे रस्ता बांधण्यात येत आहे. मात्र या रस्ता बांधकामात विविध प्रकारची मिसळामिसळ होत असल्याने मसैनिकांनी यावर निशाणा साधला आहे. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला होणाऱ्या पोलिस संचलनासाठी हा मार्ग बांधला जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.(MNS  Sandeep Deshpande angry Protest against Shiv Sena)

पण, मात्र हा रास्ता काँक्रीटचा आहे असे म्हंटल जात आहे.  त्यासाठी मनेसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांच्यासह सर्व रहिवाशांनी मैदानात खडी टाकण्यास विरोध केला. मैदानात मातीची कामे करा. पण, सिमेंटस खडी आणि रेतीचा वापर करू नका. मैदानात दररोज हजारो मुलं खळेतात. त्यामुळे खडी उखडल्यास खेळाडूंना त्रास होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते.

शिवाजी पार्क मैदानात मधोमध संचलनासाठी रस्ता बांधण्यात येत आहे. पण, हा रस्ता काँक्रीटचा बांधला जात आहे असे म्हंटले जात आहे. या रस्त्यासाठी खडी वापरण्यास मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यावरूनच आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसैनिकांसोबत स्थानिक रहिवाशींनी देखील याला विरोध दर्शवला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजी पार्कमध्ये मनसे विरुद्ध शिवसेना… शिवाजी पार्कचे नुतनीकरण सुरू असताना वादाला सुरुवात!

बऱ्याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली;मराठी पाट्यावरून मनसेचा टोला!

मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाचा विसर, मनसेने करून दिली आठवण

‘Where’s Maharashtra dharma?’ — Raj Thackeray silence on Kangana row sparks discontent in MNS

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात काँक्रीटचे रस्ते बांधून मैदान गिळंकृत करायचं आणि दुसरीकडे शिवाजी पार्क फेस्टिवल भरवायचं हे काहीतरी पालिकेचे भलतेच सुरु आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकोवतोय, असा निशाणा देखील त्यांनी शिवसेनेवर साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी