38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयखासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप प्रत्यारोप थांबवावे...

खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप प्रत्यारोप थांबवावे -हेमंत पाटील      

टीम लय भारी

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे सतत एकमेकांच्या विरोधात टीका करत असतात. या आरोप-प्रत्यारोप त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत असून या दोघांनी त्यांची बकबक तात्काळ थांबवावी अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन के राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. या विरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करीत असून यांच्या दोघांपासून जनतेला कुठलाही प्रकारचा फायदा होत नाही.

त्यामुळे या दोघांविरोधात मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ईडीकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती भारत अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. महा विकास आघाडी सरकार मधील शिवसेना नेते व खासदार संजय राऊत व भाजपा नेते किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांवर एकमेकांविरोधात बोलत आहेत.

त्यामुळे विनाकारण लोकांचा ब्रेन हॅमरेज होत आहे. याविरोधात शुक्रवारी मुंबई हायकोर्टात याचिका  दाखल करण्यात आली आहे, दोघांच्याही वागण्यामुळे समाजात दंगल होऊ शकते, त्यामुळे दोघांनाही प्रसार माध्यमाशी बोलू देऊ नये,असे हेमंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात हेमंत पाटील यांनी खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या या दोघांनाही नोटीची पाठवलेले आहेत. या दोघांना काही आपलं म्हणणे मांडायचे असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी