29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयपहाटेचे सरकार गेल्याने भारतीय जनता पक्षाची सत्तेसाठी तडफड : नाना पटोले

पहाटेचे सरकार गेल्याने भारतीय जनता पक्षाची सत्तेसाठी तडफड : नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई:  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला होता. मात्र हा प्रयोग फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. Maharashtra state Congress president Nana Patole’s statement

सत्ता गेल्यामुळे भाजपची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपची काळी नजर आहे, परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही असं मत यांनी व्यक्त केलं आहे.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे. कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. राज्याची  परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढे किमान समान कार्यक्रम राबविला जाईल असं पटोले यांनी म्हटलं आहे. Maharashtra state Congress president Nana Patole’s statement

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. या महाविकास आघाडी सरकारचा विरोधकांना त्रास होत आहे. मविआ सरकार अस्थिर व्हावे यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत आहे. Maharashtra state Congress president Nana Patole’s statement

राजभवनच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. सत्ता नसल्याने भाजपाचा जीव कासावीस झाला आहे परंतु महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून ५ वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल असा विश्वास नाना पटोले व्यक्त केला आहे. Mahavikas Aghadi is strong and will complete its term of 5 years

हे सुध्दा वाचा: 

BJP slams Patole over ‘Modi’ remark; Cong state chief says was not talking about PM

प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात भाजपाल आहे, नाना पटोले

मशिदींमध्ये लावलेले बेकायदा लाऊडस्पीकर हटवा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी