32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयराऊतांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न , प्रवीण दरेकर

राऊतांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न , प्रवीण दरेकर

टीम लय भारी

मुंबई:- कालपासून भाजपच्या व्यक्तींवर आरोप करणं सुरू आहे. ते आरोप करतात ते ठीक आणि दुसर कुणी भाजपच्या व्यक्तीने काही बोललं तर ते राजकारण म्हणायचं, हे योग्य नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे(Praveen Darekar’s Sanjay Rautna Tola)

प्रवीण दरेकर म्हणाले की “संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचं मत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात महाराष्ट्रासाठी काय केलं हे मुंबईसह महाराष्ट्राला माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

नवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता : प्रवीण दरेकर

निमंत्रण पत्रिकेवर नाही परंतु जनतेच्या मनात फक्त देवेंद्र फडणवीस

किरीट सोमय्या यांचा धक्कादायक आरोप, संजय राऊत यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे

Attack on Somaiya was well planned: Darekar

मोदींनी मुंबईतून परप्रांतिय मोठ्या प्रमाणावर गेल्यानं कोरोना पसरला आणि याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.राऊतांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न होत आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर केली आहे.”

काल संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला. या आरोपावर आता महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘पंतप्रधानांचे वक्तव्य ऐकून वाईट वाटलं,’असे राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी