31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयसमीर वानखेडेंचे आणखी एक फर्जीवाडा केंद्र, नवाब मलिकांनी फोटो ट्विट करत पुन्हा...

समीर वानखेडेंचे आणखी एक फर्जीवाडा केंद्र, नवाब मलिकांनी फोटो ट्विट करत पुन्हा उडवली खळबळ

टीम लय भारी

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक फोटो ट्विट केला आहे. समीर दाऊद वानखेडे यांचे आणखी एक बोगस केंद्र असे नवाब मलिक म्हणाले आहेत. एका हॉटेलचा फोटो टाकत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या हॉटेलबाबतचे रहस्य काय आहे? याची माहिती अद्याप नवाब मलिक यांनी दिली नाही (Nawab Malik’s new allegations against Sameer Wankhede).

नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांचा शाळेचा दाखला आणि इतर कागदपत्र कोर्टात सादर केल्यानंतर आता एका हॉटेलचा फोटो ट्विट केल्यामुळे आता नवीन कोणता आरोप करण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री काढून घ्या; नवाब मलिक संतापले

रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार का बसले होते, स्पष्टीकरण द्या : नवाब मलिक

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. बोगस ड्रग्ज कारवाई, बोगस जातप्रमाणपत्र आणि पहिल्या पत्नीला धमकावले तसेच तिच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आले असे अनेक आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्राबाबत वानखेडेंची चौकशी सुरु आहे. तसेच त्यांची आर्यन खान खंडणी प्रकरणातही एनसीबी एसआयटी टीम चौकशी करत आहे.

नवाब मलिकांचे क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप, वानखेडेंनी दिले यावर स्पष्टीकरण

Nawab Malik shares school leaving certificates mentioning ‘Dawood’ as Sameer Wankhede’s middle name

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरुन मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक फोटो ट्विट करत म्हणाले आहेत की, “समीर दाऊद वानखेडे यांचे आणखी एक बोगस केंद्र” दरम्यान फोटो एका हॉटेलचा असून त्या हॉटेलचे नाव सद्गुरु रेस्टो बार असे आहे. समीर वानखेडे यांचा या हॉटेलशी काय संबंध आहे? याबबात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी