34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमुंबई देशाची धडकन म्हणत मोदींनी घातली मुंबईकरांना साद; महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

मुंबई देशाची धडकन म्हणत मोदींनी घातली मुंबईकरांना साद; महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

मुंबईतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार म्हणत गुरूवारी (दि. १९) रोजी पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मुंबईतील फेरीवाला, गोरगरीब ते उद्योगपतींच्या स्वप्नातील मुंबई साकारण्याची देखील ग्वाही सर्व घटकांना देत त्यांनी आज विविध विकास कामांच्या लोकार्पणाच्या भाषणात मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुंबईतील रस्ते, मेट्रो, प्रदुषण, दळणवळण अशा अनेक मुद्द्यांवर आज त्यांनी मुंबईकरांना साद घातली. मुंबई ही देशाची धडकन आहे, आता डबल इंजिनचे सकार असून शिंदे आणि फडणवीसांची जोडी आपल्या सर्वांची स्वप्ने पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे असे देखील मोदी म्हणाले. आज मुंबईच्या विकासासंबंधीत ४० हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण (Inauguration of development works) झाले. मुंबईसाठी गरजेची असेली मेट्रो Mumbai Metro, छ. शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) पुनर्विकासाचे काम, रस्तेविकासाची कामे, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखानाची सुरुवात असो या मुंबई शहराचा विकास करण्यासाठी मोठी भूमिका निभावत आहेत. असे देखील मोदी आपल्या भाषणात म्हणाले. (PM Modi blew the trumpet of Mumbai Municipal Elections)

मुंबईत ३०० किलोमीटर मेट्रोचे जाळे उभारणार
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, विकसित भारताच्या निर्मितीत आपल्या शहरांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यात देखील महाराष्ट्राचा विचार केला तर येणाऱ्या २५ वर्षात राज्यातील अनेक शहरे भारताच्या अर्थव्यवस्थेला गती दणारी असतील, त्यामुळे मुंबईला भविष्यासाठी तयार करणे ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता असेल. आमची ही वचनबद्धता मुंबईमध्ये मेट्रो विस्ताराच्या नेटवर्कमध्ये देखील दिसते. २०१४ पर्यंत मुंबईत केवळ १० ते ११ किमी मेट्रो धावत होती. जसे ही डबल इंजिन सरकार आले, तसा मेट्रोचा वेगाने विस्तार झाला. काही काळ काम थोडे कमी झाले मात्र शिंदे- फडणवीस सरकार येताच पुन्हा वेगाने कामे सुरू झाली. मुंबईत ३०० किलोमीटर मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी आम्ही वेगाने पुढे जात आहोत. आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनविण्यासाठी काम केले जात आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी देखील त्याचा फायदा होत आहे, असे मोदी म्हणाले.

मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी उभारणार
डबल इंजिन सरकार सामान्य लोकांना देखील त्याच आधुनिक सुविधा, तशीच स्वच्छता, तशाच वेगवान विकासाचा अनुभव देण्याच्या तयारीत आहे, जो कधीकाळी धनाढ्य लोकांनाच मिळत होत्या. त्यामुळे आज रेल्वे स्थानकांना देखील विमानतळांच्या धर्तीवर विकसित केले जात आहे. देशातील सर्वात जुण्या स्थानकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील कायापालट होणार आहे. आमचा हा वारसा आता २१ व्या शतकातील भारताची शान म्हणून विकसित होत आहे. येथे लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा निर्मान होतील. लक्ष्य केवळ हेच आहे, की सर्वसामान्य प्रवाशाला चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात कामासाठी येणेजाणे सोपे व्हावे, हे स्थानक केवळ रेल्वेच्या सुविधांपुरते मर्यादित नाही राहणार तर मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीचे हब असेल. जेसे बस, मेट्रो, टॅक्सी, दळणवळणाची हरप्रकारची साधने येथे एकाच छताखाली कनेक्टेड असतील. त्यामुळे प्रवाशांना सहज कनेक्टिव्हिटी मिळेल. हीच मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी आहे. जी आम्ही देशातील प्रत्येक शहरात विकसित करणार आहोत. आधुनिक होत असलेली मुंबई लोकल, मेट्रोचे वाढते जाळे, वंदे भारत, बुलेट ट्रेन अशा आधुनिक कनेक्टिव्हिटीमुळे येणाऱ्या काही वर्षातं मुंबईचा कायापालट होणार आहे, असे मोदी म्हणाले.

विकासकामे, प्रदुषण ते स्वच्छता
पंतप्रधान मोदी म्हणाले गरीब, कामगार, दुकानदार, मोठे उद्योगपती सगळ्यांना येथे राहणे सुविधाजनक असेल. तसेच आसपासच्या जिल्ह्यातून देखील मुंबईत येणे जाणे सुलभ होणार आहे. कोस्टल रोड, इंदू मिल स्मारक, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक असे अनेक प्रोजेक्ट मुंबईला नवी ताकद देत आहेत. धारावी पनर्विकास, जुण्या चाळींचा विकास सगळेकाही आता मार्गी लागत आहे. मी त्यासाठी शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा देतो. मुंबईतील रस्त्यांच्या विकासासाठी देखील आज मोठ्याप्रमाणात विकास करणे हे देखील डबल इंजिन सरकारची वचनबद्धता दर्शविते. आज आम्ही देशातील शहरांच्या कायापलट करण्याचे काम करत आहोत. प्रदुषण ते स्वच्छता शहरांच्या प्रत्येक समस्येचे समाधान शोधले जात आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीवर अधिक भर देत असून त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहोत, बायोफ्युअल आधारीत दळणवळण सुविधा आम्ही आणू इच्छुतो. हायड्रोजन इंधनावर देखील आम्ही काम करत आहोत. तसेच आमच्या शहरात कचऱ्याची जी समस्या आहे ती देखील नव्या तंत्रज्ञानाने दुर करण्यासाठी आम्ही पाऊले उचलत आहोत.

 

हे सुद्धा वाचा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे पालटणार; कसे असेल नवे अत्याधुनिक कॉम्प्लेक्स, काय होणार बदल?

डबल इंजिन सरकार नसल्याने मागील काळात विकास खुंटला; पंतप्रधान मोदी यांची टीका

PHOTO : पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाबासकी

मुंबईच्या विकासात स्थानिक संस्थांची भूमिका मोठी
नद्यांधील प्रदुषित पाणी हटविण्यासाठी जलशुद्धिकरण प्रकल्प उभारत आहोत. शहरांच्या विकासासाठी देशाकडे सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्तीची कसलीच कमी नाही, मात्र आम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, मुंबई सारख्या शहरात स्थानिक संस्थांची प्राथमिकता वेगवान विकासाची नसेल तोपर्यत प्रकल्प वेगाने होऊ शकत नाहीत. जेव्हा विकासाला समर्पित सरकार असते, जेव्हा शहरात सुशासनासाठी समर्पित असे शासन असते तेव्हाच ही कामे वेगाने होतात. त्यासाठी मुंबईच्या विकासात स्थानिक संस्थांची भूमिका खुप मोठी आहे. मुंबईच्या विकासासाठी आमच्याकडे आर्थिक कमतरता नाही फक्त मुंबईच्या विकासाचा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. जर तो भ्रष्टाचारात लागला, पैसा बॅँकांच्या तिजोरीत राहिला तर विकासाची कामे थांबविण्याची प्रवृत्ती राहील. तर मग मुंबईचे भविष्य उज्ज्वल कसे राहील मुंबईची जनता समस्यांमध्ये राहतील हे शहर विकासाची वाट पाहत रहावे हे २१ व्या शतकातील भारतात आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्विकारार्ह असू शकत नाही, असे मोदी म्हणाले.

मधल्या काळात डबल इंजिन सरकार नसल्याने प्रत्येक कामात अडचणी
मोदी म्हणाले, मी मुंबईतील लोकांची प्रत्येक समस्या समजून घेत मोठ्या जबाबदारीने सांगतो भाजप, एनडीएचे सरकार विसासाच्या आड कधीच राजकारण आणत नाही. विकास आमच्यासाठी सर्वात मोठी प्राथमिकता आहे. राजकीय स्वार्थासाठी भाजप आणि एनडीए सरकार विकासकामांना ब्रेक लावत नाही. मात्र आधीच्या काळात आम्ही मुंबईत अस होताना वारंवार पाहिले आहे. पीएम स्वनिधी योजना देखील त्याचे उदाहरण आहे. शहरातील फेरीवाले, कामगार हे शहराचा महत्त्वाचा भाग आहेत त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदा योजना राबविली. छोट्या व्यापाऱ्यांसाठी आम्ही स्वस्तात कर्ज देण्याची सोय केली. देशभरात जवळपास ३५ लाख छोट्या दुकानदारांना त्याचा लाभ मिळाला, तर महाराष्ट्रात ५ लाख जणांना त्याचा लाभ मिळाला. आज देखील १ लाखांहून अधिक जणांच्या बॅँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. हे काम खुप आधी होणे गरजेचे होते. मात्र मधल्याकाळात डबल इंजिन सरकार नसल्याने प्रत्येक कामात अडचणी निर्मान केल्या. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना नुकसान झेलावे लागले. असे पुन्हा घडू नये यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत चांगली व्यवस्था निर्मान व्हावी.

फेरीवाले, छोटे दुकानदार यांना आवाहन
स्वनिधी योजना ही केवळ कर्ज देणारी योजना नाही तर फेरीवाले, ठेलेवाल्यांचे आर्थिक सामर्थ्य वाढविणारी योजना आहे. ही स्वनिधी स्वाभिमानाची जडीबु्ट्टी आहे. स्वनिधीच्या लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहाराच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत सव्वातीनशे कॅम्प लावले. त्यामुळे आपले हजारो फेरीवाल्यांनी डिजिटल व्यवहार सुरू केले. अनेकांना धक्काबसेल की एवढ्या कमी काळात देशभरात स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांनी जवलपास ५० हजार कोटींचे डीजिटल ट्रांजेक्शन केले आहे. ज्याना आपण आडाणी म्हणतो त्यांनी ऑनलाईन मोबईलवरुन ५० हजार कोटींचे काम केले आहे. त्यांचे हे काम निराशावाद्यांसाठी खणखणीत उत्तर आहे. ते म्हणत होते फेरीवाल्यांकडे डिजिटल पेमेंट कसे होणार त्यांच्यासाठी डिजिटल इंडीयाचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. सगळ्यांचे प्रयत्न होतात तेव्हा अशक्य काहीच नसते. आपण सगळे मिळून मुंबईला एका उंचीवर घेऊन जाऊ, मी फेरीवाल्यांना सांगू इच्छितो तुम्ही १० पावले माझ्यासोबत चाला मी ११ पावले तुमच्या सोबत चालेन, असे आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी