33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे पालटणार; कसे असेल नवे अत्याधुनिक कॉम्प्लेक्स, काय...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे पालटणार; कसे असेल नवे अत्याधुनिक कॉम्प्लेक्स, काय होणार बदल?

नव्या स्थानक कॉम्प्लेक्समध्ये कॅफेटेरिया, किरकोळ करमणूक सुविधांसाठी मोकळी जागा असणार आहे. याशिवाय, ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवरील छतावरून आर्केड तसेच लिफ्ट/एस्केलेटर, दिव्यांगजनांसाठी सुविधा, वर्धित प्रवाशांच्या सोयीसाठी चिन्हांसह प्रदीपन मार्ग शोधणे, सीसीटीव्ही आणि ऍक्सेस कंट्रोलच्या तरतुदीसह सुसज्ज असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) कायापालट प्रकल्पाचे उद्घाटन केले  आहे. देशातील देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्टेशनपैकी एक असलेल्या, हेरिटेज दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आता नव्याने विकसित होणार आहे. (CSMT station will be redeveloped) या परिसरात अत्याधुनिक कॉम्प्लेक्स उभे राहणार आहे. याशिवाय, काय होणार आहेत बदल ते जाणून घेऊया ….

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे पालटवणाऱ्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्याचे काम मिशन मोडवर सुरू आहे.  मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला गती मिळतेय. त्या अंतर्गत रेल्वे सीएसएमटी स्थानकाला  विमानतळाप्रमाणे विकसित करण्यात येत आहे. नव्या कॉम्प्लेक्समध्ये लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा बनतील. सामान्य प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील. कर्मचाऱ्यांना ये-जा करताना सुलभ होईल. यामुळे केवळ रेल्वे स्टेशनच विकसित होणार नाही, तर वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील.

मल्टिमॉडेल कनेक्टिव्हीटी देशातील सर्व शहरात विकसित केले जात आहे. येणाऱ्या काही वर्षात मुंबईचाही कायापालट होणार आहे. गरीब मजूर, कर्मचारी, दुकानदार, व्यापाऱ्यांसाठी इथे सुविधा असतील. त्याचसोबत आसपासच्या जिल्ह्यातील लोकांनाही मुंबईत येणे सोपे होणार आहे. मुंबईला नवीन ताकद देणारे अनेक प्रकल्प सध्या सुरु आहे. सर्वकाही ट्रॅकवर येतेय. त्यासाठी मी शिंदे-फडणवीसांचे आभार मानतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या सीएसएमटी स्टेशनचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानुसार, अखेर सीएसटी स्थानकाचा  पुनर्विकास केला जाईल. तब्बल 133 वर्ष रेल्वे प्रवाशांच्या सेवेत सीएसएमटी स्थानक उभे आहे. मात्र, जागतिक वारसा असलेल्या या स्थानकात आता प्रवासी संख्या वाढल्याने सोयी-सुविधांचा अभाव जाणवू लागलाय. जागा कमी पडू लागली आहे. त्याचबरोबर या वास्तूचा जागतिक दर्जा टिकवायचा असेल तर काही बदल करणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाला वाटत होते. म्हणूनच या वास्तूचा पुनर्विकास करण्याचे ठरवले गेले.

राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात आहे. त्यात शिंदे गट व भाजपने आघाडी घेतली आहे. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. सीएसएमटी कायापालट प्रकल्प हा त्यातीलच एक भाग.

हे सुद्धा वाचा : सीएसएमटी स्थानकातून पनवेलला जाणारी ट्रेन बफरला धडकली

Mumbai water transport projects : मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार!

Safran Project : आता आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राच्या बाहेर

स्थानकाचा पुनर्विकास करणार म्हणजे नेमके काय करणार ?

  • कॅफेटेरिया, किरकोळ करमणूक सुविधांसाठी मोकळी जागा असणार आहे.
  • ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवरील छतावरून आर्केड तसेच लिफ्ट/एस्केलेटर, दिव्यांगजनांसाठी सुविधा, वर्धित प्रवाशांच्या  सोयीसाठी चिन्हांसह प्रदीपन मार्ग शोधणे, सीसीटीव्ही आणि ऍक्सेस कंट्रोलच्या तरतुदीसह सुसज्ज असणार आहे.
  •  विद्यमान दक्षिण हेरिटेज नोडची गर्दी कमी होणार, पुरेशी पार्किंग सुविधा, मेट्रो लाइनसह एकत्रीकरण केले जाईल.
  •  आगमन आणि निर्गमनाचे पृथक्करणाची सोय,  स्कायवॉक कनेक्शन, सौर ऊर्जा, जलसंधारण/पुनर्वापर, एसटीपी, घनकचरा व्यवस्थापनाची सोय असणार आहे.
  • याशिवाय सध्याच्या अॅनेक्स बिल्डिंग समोरील टॅक्सी स्टँड हटवण्यात येईल. याजागी मोकळी जागा निर्माण करून प्रवाशांना बसण्यासाठी आणि वावरण्यासाठी सुविधा निर्माण केली जाईल.
  • मस्जिद बंदर स्थानकाच्या दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटाचे नूतनीकरण देखील करण्यात येणार आहे.

या सुविधांच्या बदल्यात सेवाशुल्क देखील आकारण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विमानतळाचा सार्वजनिक खासगी भागीदारीतून पुनर्विकास करून त्यावर सेवा शुल्क आकारले जाते. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात सीएसएमटी स्थानकात देखील सेवाशुल्क आकारले जाईल, याचा परिणाम म्हणून तिकिटांचे दर वाढवण्यात येतील. या सेवाशुल्क वाढीमुळे प्रवासी संघटना नाराज आहे. मात्र, गेल्या 133 वर्षात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्यात येत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या स्थानकाला जर जागतिक दर्जाचे बनवले गेले, तर नक्कीच पुरातन आणि आधुनिक सोयी-सुविधांचा संगम आपल्याला या स्थानकात दिसून येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी