30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रफक्त खुर्चीवर सावरून बसलो म्हणून…CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना उत्तर देत व्यक्त केली...

फक्त खुर्चीवर सावरून बसलो म्हणून…CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना उत्तर देत व्यक्त केली खंत

नेहमी चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice Dy Chandrachud) हे सध्या ट्रोलर्समुळं चर्चेत आले आहेत. अनेकदा न्यायालयाच्या कामकाजाचे लाइव्ह स्ट्रिमिंग केले जाते. हे कामकाज हजारो लोक पाहत असतात. अशाच एका सुनावणीच्या लाइव्ह स्ट्रिमिंगनंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता या ट्रोलर्सना चंद्रचूड(Chief Justice Dy Chandrachud) यांनी उत्तर देत खंत व्यक्त केली आहे.

नेहमी चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI Chandrachud) हे सध्या ट्रोलर्समुळं चर्चेत आले आहेत. अनेकदा न्यायालयाच्या कामकाजाचे लाइव्ह स्ट्रिमिंग केले जाते. हे कामकाज हजारो लोक पाहत असतात. अशाच एका सुनावणीच्या लाइव्ह स्ट्रिमिंगनंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता या ट्रोलर्सना चंद्रचूड(Chief Justice Dy Chandrachud) यांनी उत्तर देत खंत व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

बंगळुरू येथे न्यायिक अधिकाऱ्यांच्या एका राज्यस्तरीय परिषदेत चंद्रचूड बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत एक घटना शेअर केली. डीवाय चंद्रचूड म्हणाले की, चार ते पाच दिवसांपूर्वी माझ्यासोबत एक प्रकार घडला. खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. यावेळी माझी कंबर थोडी भरून आली. मी थोडा सावरून बसलो. खुर्चीवर माझ्या बसण्याची स्थिती बदलली. या छोट्याश्या कारणावरून मला ट्रोल केले गेलं. अशा माहिती चंद्रचूड यांनी यावेळी दिली.

दिल्लीचा कारभार आता तुरुंगातून चालणार; केजरीवालांचा पहिला आदेश जारी

तसेच, या प्रसंगानंतर सोशल मीडियावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. सरन्यायाधीश यांचं वागणं अहंकारी असल्याचं काहीजण म्हणाले. सुनावणी सुरू असताना मी उठू किंवा माझ्या बसण्याची स्थिती बदलू कसा शकतो? असा आक्षेप ट्रोलर्सनी घेतला. असं सांगत चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना गोड शब्दात उत्तर दिलं.

“ट्रोलर्स हे कधीच सांगणार नाहीत की, मी फक्त बसल्या जागी माझी स्थिती बदलली. सुनावणी सुरू असताना मी उठून गेलो, असे चित्र निर्माण केले गेले. २४ वर्ष मी न्यायनिवाडा करत आहे. आजवर कधीही मी न्यायालयाचे कामकाज सोडून बाहेर पडलेलो नाही.

रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

मी फक्त आहे त्याच जागी बसण्याची स्थिती बदलली तर मला ट्रोल केलं जातंय, असभ्य भाषेचा वापर केला जातो. पण मला विश्वास आहे की, आम्ही जे काम करत आहोत, त्यावर सामान्य माणसांचा विश्वास आहे. त्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचे काम आपल्याला करत राहायचे आहे”, असं चंद्रचूड यावेळी म्हणाले.

घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी, अजित पवारांच्या NCPचे पहिले निवेदन प्रसिद्ध

यासोबतच, न्यायालयात बोलत असताना कधी-कधी वकील आणि वादी आपल्या मर्यादांचे उल्लंघन करतात. अशावेळी न्यायालयाची अवहेलना न समजता त्यांनी मर्यादेचे उल्लंघन का केले? हे मोठ्या मनानं समजून घ्यायला हवं. काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन निर्माण करणं हे न्यायदानाच्या कामाशीच निगडित आहे. इतरांना सुधारण्याऐवजी आपण स्वतःला आणखी कसे सुधारू शकतो, यावर लक्ष दिलं गेलं पाहीजे असंही चंद्रचूड यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी