36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता?

पुण्यात नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता?

टीम लय भारी

पुणे:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 5 हजारांच्या जास्त कोरोना रुग्ण आले आहेत. मात्र, गेल्या 24 तासात 10 हजार पेक्षा जादा कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं समोर आलं आहे.राज्यात ही कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दररोज ४० हजारांच्या पुढे रुग्ण सापडत असल्याने येणाऱ्या काळात आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढणार आहे.( Pune in likely New restrictions)

पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची कोरोना बैठक बोलवालीय. या बैठकीत अजित पवार काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. तिसऱ्या लाटेत देखील मुंबई आणि पुणे हे कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात 43 हजार 211 रुग्ण सापडले आहेत.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्र्यांना खंडणी बहाद्दरांनीच लावला चुना

पुण्यात कोरोनाचा कहर, 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

अभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

Police identify 19 accident-prone blackspots in Pune city

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने होत असलेले बदल अचानक वाढत असलेला गारठा, तसेच विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक पुणेकर सध्या सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आणि अंगदुखीने नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांवर गेली असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील गेल्या महिन्यांतील सर्वात उच्चांकी रुग्णसंख्या असल्याचं समोर आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोना आढावा बैठक घेण्यात येणार आहे. आज 4 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. कौन्सिल हॉल या ठिकाणी पार पडणाऱ्या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. तसेच अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी