30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयप्रविण दरेकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र

प्रविण दरेकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मलिक यांनी राजकीय देखावा न आणता स्वतः कडील माहिती केवळ प्रसारमाध्यमांसोबत उघड करून वेळ घालवण्यापेक्षा ती माहिती संबंधित तपास यंत्रणांकडे द्यावी. जेणेकरून त्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होऊ शकेल. असा खोचक टोला दरेकर यांनी केला आहे (Pravin Darekar attack on minority minister Nawab Malik).

क्रुझवरील कारवाईमध्ये १० लोकांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. मात्र त्यातील दोन लोकांना सोडण्यात आले असून, त्यामध्ये भाजपचा एक मेहुणा असल्याची माहिती मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. भाजपच्या त्या मेहुण्याचे नाव मी उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करेल असे मलिक म्हणाले होते.

महाबळेश्वर येथील दोन घोडेचालकां विरोधात गुन्हा दाखल

शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसलाय मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

त्या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, मलिक यांच्या वक्तव्यामध्ये काही तथ्य दिसत नाही. जर मलिक यांच्या दाव्यानुसार पकडण्यात आलेल्यांमध्ये जर कोणत्या पक्षाच्या नेत्याचा नातेवाईक असेल तर एनसीबी त्या विरुध्द नक्कीच कारवाई करेल. अटक केल्यानंतर कोणाचाही अशी सुटका होत नाही.

निमंत्रण पत्रिकेवर नाही परंतु जनतेच्या मनात फक्त देवेंद्र फडणवीस

Cruise Ship ‘Raid’: Top BJP Leader’s Brother-in-Law Among 2 let off by NCB, Alleges NCP

प्रविण दरेकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र

तरीही मलिक यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत जास्त वेळ घालविण्यापेक्षा त्या संबंधित तपास यंत्रणेकडे तक्रार करावी आणि त्यांना माहिती द्यावी. जेणेकरुन तपास योग्य पध्दतीने होईल व संबंधितांविरुध्द कारवाई होऊ शकेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी