35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयस्पर्धा होण्यापूर्वीच प्रथम क्रमांक देऊन मोकळ्या, पी ए बदलण्याचा नेटकऱ्यांनी दिला सल्ला

स्पर्धा होण्यापूर्वीच प्रथम क्रमांक देऊन मोकळ्या, पी ए बदलण्याचा नेटकऱ्यांनी दिला सल्ला

 

टीम लय भारी

बीड : राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धांच्या निकालाची वाट न पाहता खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रथम क्रमांक कुणाला मिळणार हे ठरवून टाकले. त्यावर नेटकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पी ए बदला असा टवाळ सल्लाही दिला आहे (pritam munde being trolled by netizens)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मागील 7 वर्षांच्या सत्ताकाळात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण आपल्याला सर्वाधिक आवडतो असे वक्त्यव्य करून प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आज पुन्हा एकदा एका फेसबुक पोस्टवरून चर्चेत आल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यावे, आणी अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद दयावे : रामदास आठवले

१९ वर्षांच्या संघर्षानंतर ओबीसींना यश

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी गावच्या सोमनाथ आघाव या तरुणाने नुकतीच राज्यस्तरीय धनुर्विद्या निवड प्रक्रिया सर्वाधिक गुण घेऊन पार केली आहे व तो पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. मात्र खासदार ताई सोमनाथला राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, अशा शुभेच्छा देऊन मोकळ्या झाल्या आहेत! विशेष म्हणजे सदर राष्ट्रीय स्पर्धा आणखी सुरूच झालेली नाही!

शिरूर कासार तालुक्यातील सोमनाथ आघाव या सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने अल्प साधनांच्या मदतीने धनुर्विद्येचा छंद जोपासत राज्य स्तरीय निवड प्रक्रियेत मजल मारली, एवढंच नव्हे तर तो सर्वाधिक गुण मिळवून ऑक्टोबर महिन्यात झारखंडमध्ये दि. 01 ते 10 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेस पात्र ठरला आहे.

मात्र ही आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये प्रीतमताईंनी सोमनाथने राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असल्याचे म्हटले आहे, इतकेच नव्हे तर त्याला राज्य स्तरावरील निवड प्रक्रियेत मिळालेले 645 गुण राष्ट्रीय स्पर्धेत मिळाल्याचा चुकीचा उल्लेख देखील प्रीतम मुंडेंच्या पोस्ट मध्ये दिसतो आहे.

खासदार प्रीतम मुंडे या उच्च विद्याविभूषित डॉक्टर असून देखील अर्धवट किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे अशी चुकीची पोस्ट केल्याने नेटकऱ्यांच्या पुन्हा एकदा निशाण्यावर आल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांना अर्धवट ज्ञान धोक्याचे असल्याचे म्हणत चक्क त्यांचा पीए बदलण्याचा देखील सल्ला दिला आहे.

pritam munde

रोहित पवारांनी भारताच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला

BJP on boil in Munde stronghold in Maharashtra as Pritam Munde doesn’t get place in Team Modi

तर काही नेटकरी जिल्ह्यातील तरुणाची नेमकी कोणत्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आणि कशात विजय झाला हे खासदारांना नीट माहीत नसणे म्हणजे संतापजनक असल्याचे म्हणताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी ध्यानात आणून दिल्यानंतर देखील प्रीतमताई मुंडे यांच्या अधिकृत फेसबुक वॉलवर ती पोस्ट अजून तशीच दिसत आहे!

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी