29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeसिनेमाकीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

टीम लय भारी

मुंबई : बिग बॉस मराठीचे नवीन पर्व सुरु झाले आहे. या नव्या पर्वात कोणत्या कलाकारांची एन्ट्री होणार हे पाहणे उत्सुकतेचे होते. याच कलाकारांच्या यादीत प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या वादग्रस्त घरात कीर्तनाचा गजर ऐकायला मिळणार आहे (Kirtankar Shivlila Patil in Bigg Boss marathi house).

कॉमेडी क्वीन भारती सिंहने चक्क १५ किलो वजन केले कमी

‘द इनकार्नेशन सीता’ सिनेमात ‘हा’ अभिनेता साकाणार लंकाधिपती रावण?

शिवलीला पाटील ह्या सामाजिक माध्यमांवरील गाजलेल्या कीर्तनकार आहेत. संत साहित्याचा गाढा अभ्यास असणाऱ्या शिवलीला पाटील यांची एन्ट्री तशीच दमदार आणि भक्तिमय वातवरण निर्माण करणारी झाली. शिवलीला ह्या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीच्या आहेत (Shivlila Patil is a popular kirtankar on social media).

का ठेवलेले शिवलीला हे नाव?

बिग बॉसच्या ग्रँड प्रीमिअर मध्ये त्यांनी महेश मांजरेकर ह्यांच्या सोबत गप्पा मारल्या. त्यांचे आई वडील देखील तेव्हा आले होते. त्यांचे नाव शिवलीला असे का ठेवले ह्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. लग्नानंतर 7 वर्षे होऊनसुद्धा त्यांना मुलबाळ होत नव्हते म्हणून, त्यांच्या आईने शिवलीला ह्या ग्रंथाचे 108 वेळा पारायण केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या आईला त्यांना बाळ झाल्याचे स्वप्न पडले. ह्या स्वप्नाबाबत त्यांनी त्यांच्या आईला सांगितले. शिवलीला ह्यांच्या आई जेव्हा डॉक्टरकडे गेल्या तेव्हा त्या गरोदर असल्याचे त्यांना समजले. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव शिवलीला असे ठेवले.

विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार

Bigg Boss Marathi 3 Grand Premiere: Netizens React To The Opening Episode Of Mahesh Manjrekar Show

शिवलीला पाटील ह्यांच्या बरोबरच भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश झाला आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी दमदार घोषणा देत त्यांनी स्पर्धकांना इशारा दिला आहे. समाजात त्यांच्या तयार झालेल्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन त्या एक व्यक्ती म्हणून कश्या आहेत, हे दाखवून देण्यासाठी त्या बिग बॉसच्या घरात आल्या आहेत (Along with Shivlila Patil, Bhumata Brigade institutional is tripti desai who has entered the Bigg Boss house).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी