28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeराजकीयपंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींच्या भावाचा भाजपामध्ये प्रवेश!

पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींच्या भावाचा भाजपामध्ये प्रवेश!

टीम लय भारी

चंदीगड: पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं केली. पंजाबमध्ये दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांच्या भावानेच भाजपामध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.( Punjab Chief Minister Channi’s brother joins BJP)

नवज्योतसिंग सिद्धूंशी असलेले मतभेत विकोपाला गेल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांच्याशीही मतभेद झाल्यानंतर सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. शेवटी पक्षश्रेष्ठींना मध्यस्थी करून सिद्धूंची मनधरणी करावी लागली. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला.

८० विरुद्ध २० च्या विधानावरून मुख्यमंत्री योगींवर नवाब मलिकांची टीका, म्हणाले…

‘देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले, अन् भाजप फुटला’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळावरून अद्याप राजकारण सुरू असून हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. त्यावरून वाद सुरू असतानाच आता पंजाबमध्ये अदून एक राजकीय भूकंप झाला आहे.

मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचे चुलत बंधू जसविंदर सिंग धालिवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीत चंदीगढमध्ये जसविंदर सिंग यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईत भाजपला धक्के पे धक्का ! नगरसेवकांचा BJP ला रामराम, NCP मध्ये केला प्रवेश

High-profile exit dents BJP’s OBC push, forces rethink at Delhi meet

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकूण ११७ सदस्यांच्या विधानसभेमध्ये सध्या काँग्रेसकडे बहुमत आहे. मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि नव्या पक्षाची स्थापना, तसेच भाजपाशी असलेली जवळीक यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी