29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeराजकीयपेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला लगावला खोचक टोला

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला लगावला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काही लोकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. देशात आधीच कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचा (Petrol-Diesel) दर गगनाला भिडत असल्याने, नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे (Rahul Gandhi has slammed the Modi government over petrol and diesel price hikes).

अनेक शहरांमध्ये तर पेट्रोलने शंभरी देखील ओलांडली आहे. तरी देखील इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरून मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे (Congress leader Rahul Gandhi has lashed out at the Modi government over the issue).

ओबीसी आरक्षणासाठी बडे नेते एकाच मंचावर येणार?; वडेट्टीवारांनी बोलावली ‘चिंतन’ बैठक!

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णांचे चोख प्रत्युत्तर

Fuel prices at fresh record high; Petrol breaches Rs 100/litre mark in Bengaluru

“मोदी सरकारच्या (Modi government) विकासाची ही परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर वाढले नाही तर जास्त ती जास्त मोठी बातमी होते.” असे राहुल गांधी (Rahul Gandhi) ट्वटिद्वार म्हणाले आहेत.

या अगोदर देखील राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सातत्याने मोदी सरकारवर (Modi government) टीका केलेली आहे. “काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. पेट्रोल पंपावर बिल घेताना मोदी सरकारने (Modi government) केलेला महागाईचा विकास दिसणार आहे. कर वसुली, महामारीच्या लाटा येत आहेत”, असे ट्विट राहुल गांधींनी (Rahul Gandhi) या आधी केलेले आहे.

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) टीकेला केंद्रीयमंत्री पेट्रोलियम धर्मेंद्र प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्युत्तर दिलेले आहे. “राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अगोदर उत्तर द्यावे, त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात इंधन दरात वाढ का आहे? राजस्थान, पंजाबमध्ये का इंधन दर वाढ झालेली आहे? अशी बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींच (Rahul Gandhi) करू शकतात. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांनी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. आज मुंबईत सर्वात महाग पेट्रोल यामुळे आहे की महाराष्ट्राचा कर देशात सर्वात जास्त आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे.” असे धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी बोलाताना बोलून दाखवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी