31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शाह - राज ठाकरे भेटीत काय घडलं? उद्धव ठाकरेंवरही झाली चर्चा

अमित शाह – राज ठाकरे भेटीत काय घडलं? उद्धव ठाकरेंवरही झाली चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )वयांनी लोकसभेच्या रणधुमाळीत भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राज्यातील राजकारणाला नवं वळण लागलं आहे. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेवेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील उपस्थित होते. मनसे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच शहा ठाकरेंच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.(Raj Thackeray and Amit Shah Meeting uddhav thackeray maharashtra politics)

अमित शाह – राज ठाकरे भेटीत काय घडलं?

एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असं अमित शाह म्हणाले.

अजित पवारांचं टेन्शन वाढलं; बड्या नेत्यानं सोडली साथ

तसेच, विधानसभेतही सोबत लढू पण जागावाटप त्याच वेळेला ठरवलं जाईल, अशी भूमिका स्पष्ट करत अमित शाह यांनी यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.

उद्धेव ठाकरेंबद्दल अमित शाह नेमकं काय म्हणाले?

याआधी उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू विधानसभेचं विधानसभेला ठरवू असं अमित शाह राज ठाकरे यांना स्पष्ट बोलल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांच्या अडचणीत वाढ? सर्वोच्च न्यायालयाचा केला अवमान

2019 च्या निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय चित्र पालटलं आणि भाजप शिवसेनेचा काडीमोड झाला आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ देण्याचं ठरवलं. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच सत्ता पालटली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी