30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे हवेत जोडीला; कारण एकनाथ शिंदे, अजित पवार नकोत जनतेला

राज ठाकरे हवेत जोडीला; कारण एकनाथ शिंदे, अजित पवार नकोत जनतेला

राज ठाकरे ( Raj Thackeray) आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट झाल्यापासून राज्यात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे भाजपला (BJP) मनसेची गरज का भासतेय? "मला बोलावलं म्हणून मी दिल्लीत आलो" अशी प्रतिक्रिया राज ठाकरे ( Raj Thackeray)  यांनी दिल्लीत पोहचताच केली होती. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात नेमकं असं काय घडल? की, राज ठाकरेंना थेट दिल्लीतून बोलवणं आलं. पण सध्या राज्यातील एकाच प्रश्नाच उत्तर हवय ते म्हणजे राज ठाकरे भाजपला का हवेत?

राज ठाकरे ( Raj Thackeray) आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट झाल्यापासून राज्यात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे भाजपला (BJP) मनसेची गरज का भासतेय? “मला बोलावलं म्हणून मी दिल्लीत आलो” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे ( Raj Thackeray)  यांनी दिल्लीत पोहचताच केली होती. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात नेमकं असं काय घडल? की, राज ठाकरेंना थेट दिल्लीतून बोलवणं आलं. पण सध्या राज्यातील एकाच प्रश्नाच उत्तर हवय ते म्हणजे राज ठाकरे भाजपला का हवेत?

राज ठाकरे यांनी नुकतचं अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भाजपसोबत जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. खरंतर भाजपनं एकनाथ शिंदे व अजित पवार यांना फोडून दोन पक्षांना सोबत घेतलंय. एकनाथ शिंदे व अजितदादा या दोघांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष खऱ्या अर्थानं भाजपच्या दावणीला नेवून बांधले आहेत.

स्वाभिमानी, कठोर व सतत भाजपला आपल्या टाचेखाली ठेवणारे अशी प्रतिमा असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचा एकही गुण एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही. पण बाळासाहेबांचे हिंदुत्व वाचवायचे असल्याचा साक्षात्कार एकनाथ शिंदे यांना झाला. त्यांनी भाजपची लाचारी पत्करली. बाळासाहेबांच्या सुपुत्राचे सरकार पाडले. शिवसेना फोडली. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला भाजपच्या ताटाखालचं मांजर बनवलं. एवढं पाप एकनाथ शिंदे, अन् त्यांच्या टोळक्यानं केलं.

अमित शाह – राज ठाकरे भेटीत काय घडलं? उद्धव ठाकरेंवरही झाली चर्चा

अजित पवार यांनी सुद्धा तेच केलं. ज्या काकांनी आपल्याला बोट धरायला शिकवलं, त्यांच्याच हाताला हिसका देवून पक्ष चोरला. एकनाथ शिंदेंचं अनुकरण करून दादांनीही राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधला. शिंदे यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपश्चात हे पाप केलं. पण अजितदादांनी तर शरद पवारांच्या जिवंतपणीच त्यांच्या उपकाराची परतफेड उलट्या तंगड्या करून केली.

एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार काय या दोन घरफोड्या चोरांविषयी मराठी जनतेच्या मनात काडीमात्र सहानुभूती नाही. खरंतर एकनाथ शिंदे हे कधीच लोकाभिमूख नेते नव्हते. ठाण्याच्या पलिकडे त्यांचा मोठा चाहता वर्ग नाही. मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर संपूर्ण सरकारी यंत्रणेचा वापर करून, आणि शेकडो कोटी प्रसिद्धीवर खर्च करून सुद्धा एकनाथ शिंदे यांना लोकप्रियता मिळवता आलेली नाही.

अजित पवारांच्या अडचणीत वाढ? सर्वोच्च न्यायालयाचा केला अवमान

अजित पवार यांची बात जरा निराळीय. पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जोपर्यंत होते, तोपर्यंत त्यांना मोठी लोकप्रियता होती. खास बारामती स्टाईलमधील त्यांचे बोलणे, शेलक्या शब्दांत दुसऱ्यांवर आसूड ओढणे, दिलेला शब्द पाळणे, सकाळी लवकर उठणे व प्रशासनावर वचक ठेवणे अशा स्वभावामुळे लोकांना ते आवडायचे. पण त्यांनी पक्षफोडी, अन् घरफोडी केल्यानंतर त्यांची लोकप्रियता घसरलीय.

एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भाजपनं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अशी राज्य सरकारमधील मोठी पदे दिली. पण याचा भाजपला फायदा होण्याऐवजी तोटाच होताना दिसतोय. या दोन नेत्यांना सामान्य मराठी माणूस शिव्याशाप देताना दिसतोय. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोन मातब्बर मराठी नेत्यांनी स्थापन केलेले पक्ष एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी संपवण्याचे काम केलंय, अशी भावना लोकांची झालीय.

अजित पवारांचं टेन्शन वाढलं; बड्या नेत्यानं सोडली साथ

भाजपच्या दावणीला बांधलेली शिवसेना व राष्ट्रवादी बाळासाहेबांची नाही, अन् शरद पवारांचीही नाही, ही लोकांची भावना आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे व अजितदादा या दोघांचा लोकसभा निवडणुकीत काहीएक फायदा होणार नाही. उलट हे दोघे भाजपसाठी पणवती ठरलेत. याची जाणीव भाजप श्रेष्ठींना झालेली दिसतेय.

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त लोकसभेच्या जागा आहेत. या जागा तब्बल ४० आहेत. एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या येण्यामुळे ४० पैकी २० सुद्धा जागा भाजप व मित्र पक्षाला मिळू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे.

अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनाच सोबत घेण्याशिवाय भाजपसमोर दुसरा पर्याय नाही. पण उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात इतकं फाटलंय की. एवढ्यात तरी उद्धव ठाकरे भाजपसोबत जुळवून घेतील असं दिसत नाही. अशा परिस्थितीत भाजपने राज ठाकरे यांच्यावर जाळं फेकलंय.

राज ठाकरे यांची महाराष्ट्रात लोकप्रियता आहे. पण लोकं मतं देत नाहीत. राज ठाकरे जोरदार भाषणं झोडतात. त्यांचे मुद्दे लोकांना भावतात. पण तरीही त्यांना मतदान मिळत नाही. राज ठाकरे यांची ही भळभळती जखम आहे. त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शाह यांची पोलखोल करणारी ‘लाव रे तो व्हिडीओ’ ही जोरदार मोहिम हाती घेतली होती. लोकांनाही ती आवडली होती. पण लोकांनी राज ठाकरे यांना मते दिली नाहीत.

‘मलाही या ग्रेट-भेटीचा…’, दिल्ली दौऱ्यानंतर अमित ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

राज ठाकरे यांना लोकं मते देत नाहीत, पण राज ठाकरे सभा गाजवतात हे मोदी व शाह यांनी हेरलंय. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली हुशार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना काम करावे लागतं आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे सभा गाजवतील. उद्धव ठाकरे, काँग्रेस व शरद पवार यांचा योग्य समाचार घेतील, अशी आशा मोदी व शाह यांना वाटली असावी.

राज ठाकरे यांना एक – दोन जागा दिल्या तरी काही हरकत नाही. त्यांचे उमेदवार जरी निवडून आले नाहीत तरी ते विरोधकांच्या नाकीनऊ आणतील. मराठी अस्मितेला चुचकारतील. त्यामुळे जनतेचेही एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी केलेल्या पापांकडे दुर्लक्ष होईल, असाच विचार मोदी – शाह यांनी केलेला असला पाहीजे. म्हणूनच आता राज ठाकरे भाजपसोबतच्या युतीमध्ये सामील होण्याची चिन्हे दिसू लागलीत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी