33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयनारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची पिवळी झाली होती; रामदास कदमांचा ठाकरेंना टोला

नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची पिवळी झाली होती; रामदास कदमांचा ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी आम्हांला देशद्रोही म्हणाल, तर जीभ हासडून देऊ असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ठाकरेंवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना जहाल भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची घाबरगुंडी उडाली होती… तुमची पिवळी झाली होती. जीभ हासडण्याची हिंमत तुमच्यात आहे का?, अशा तिखट भाषेत उद्धव ठाकरे यांना त्यांनी सुनावले आहे. त्यामुळे आता राजकीय धुळवडीला सुरुवात झाली असून ठाकरे गटाकडून रामदास कदम यांना काय प्रत्युत्तर दिले जाते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंच्या कालच्या तमाशाला मी १९ तारखेला उत्तर देईन. ठाकरे १०० वेळा खेडमध्ये आले तरी, योगश कदमांना पाडू शकणार नाहीत, असे आव्हानच कदम यांनी ठाकरेंना दिले आहे. (Ramdas Kadam criticize Uddhav Thackeray)

Ramdas Kadam criticize Uddhav Thackeray

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये रविवारी उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांनीही तितक्याच आक्रमकपणे पलटवार केला आहे. ‘खाऊन खाऊन मजलेत बोके, पन्नास खोके, पन्नास खोके’, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटातील नेत्यांना सतत हिणवलं आहे. त्यालादेखील कदम यांनी प्रत्युत्तर दिले असून खोके तुम्ही घेतले आम्ही नाही. भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात धनुष्यबाण देऊ शकत नाही, असा टोला लगावला आहे.

भास्कर जाधव हा बाडगा तुम्हाला एकनिष्ठ वाटतो
रविवारच्या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्यावरही रामदास कदम यांनी शरसंधान केले आहे. ते म्हणाले, “भास्कर जाधव नावाचा लांडगा तुम्हाला आवडतो. ‘नया मुल्ला जोरसे बांग देता है..’ तसं तुम्हाला हा बाडगा आता कडवा आणि एकनिष्ठ वाटतो.” निवडणूक लढवण्यासाठी टेंपोभरून मी मदत पाठवली होती हे हा बाडगा विसरला. १९९५ ला तुला तिकिट कुणी दिलं होतं भास्कर जाधव हे तू विसरलास का? असा सवाल कदम यांनी भास्कर जाधव यांना विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

अपघातात मृत्यू पावलेल्या बिहारी मजुराच्या कुटुंबियांना समीर वानखडेंचा मदतीचा हात

भाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच ती वेळ

माझ्यावर काहीही आरोप कराल तर याद राखा, मानहानीचा दावा ठोकेन ! रामदास कदम यांचा ठाकरेंना इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी