33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रढगाळ वातावरण...उन्हाळ्यात पावसाचा दणका! 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

ढगाळ वातावरण…उन्हाळ्यात पावसाचा दणका! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

राज्यात अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही शेतमालाची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, कुठल्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणात पाऊस पडेल? वाचा हवामानाचा अंदाज...

राज्यात सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. (Rain news)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पालघर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर छत्रपती संभाजीनगर, पूर्व विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्येदेखील ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती विल्हेवाट लावावी, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होणार आहे. सध्या कोकण वगळता इतर महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत गडकराटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. ७ मार्चला अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता आहे. मात्र, मुंबईमध्ये याचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही पण अंशत: ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, आज दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि ग्रामीण परिसरात आभाळ वातावरण आहे. मनमाड शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू होताच शहराची बत्ती गुल झाल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे. पालघर, डहाणू , तलासरी, वाडा, विक्रमगड, कुडूस या भागात रात्रीच्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, काजू, मिरचीसह शेतपिकांना याचा फटका बसला असून जिल्ह्यातील वीट उत्पादक व्यावसायिकांचही नुकसान झाले आहे. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची गडगडाटासह शक्यता आहे. ०६ मार्चपासून विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची गडगडाटासह शक्यता आहे. तर ०७ मार्चपासून संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची गडगडाटासह शक्यता आहे. ०८ मार्चपासून अमरावती, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :

MSEDCL : मुंबईकरांना होणार 15% वीज दरवाढीची डोकेदुखी

स्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी वाढला, महागाईचा भडका

सर्वसामान्यांसाठी बातमी! लिंबाचे दर कडाडले; वाचा सविस्तर…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी