35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeराजकीयRavikant Varpe : 'मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात'

Ravikant Varpe : ‘मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात’

फोटोत मुख्यमंत्री शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हाच फोटो राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस नेते रविकांत वरपेंनी सोशल मीडियावर टाकून बापलेकांची खिल्ली उडवून गांभीर्याने या बिनबोभाटपणे चाललेल्या शिंदेशाहीचे दर्शन घडवले आहे. 

सत्तांतराच्या नाट्यानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले परंतु रोजच वेगवेगळ्या कारणांनी या सरकारवर वेगवेगळ्या स्तरातून टीका होत असल्याचे दिसून येते. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले ही बाब अनेकांना खटकत असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना फैलावर घेण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता एका फोटोची भर पडली असून सगळीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांच्या मुलावर टीका करण्यात येत आहे. सदर फोटोत मुख्यमंत्री शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हाच फोटो राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस नेते रविकांत वरपेंनी सोशल मीडियावर टाकून बापलेकांची खिल्ली उडवून गांभीर्याने या बिनबोभाटपणे चाललेल्या शिंदेशाहीचे दर्शन घडवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे, आणि त्यावर मजकूर सुद्धा लिहिला आहे. पोस्टमध्ये वरपे लिहितात, खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर? असा सवाल करीत शिंदेंच्या लेकाचा प्रताप सांगण्याचा प्रयत्न केला आहे. टीकेची झोड उठवत रविकांत वरपे यांनी शिंदे बाप लेकाला पोस्टच्या माध्यमातून चांगलेच धारेवर धरले आहे.

हे सुद्धा वाचा…

World Cinema Day : आता केवळ 75 रुपयांत सिनेमागृहात पाहता येणार सिनेमा

ODI IND vs AUS : भारताच्या पुनरागमनात पावसाचे विघ्न! वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

Raj Thackeray : … तर महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील, राज ठाकरेंचा इशारा

दरम्यान, सदर फोटो वर्षा बंगल्यावर टिपण्यात आला की आणखी कुठे याबाबत अद्याप खात्रीशीर बातमी हाती लागलेली नाही, परंतु रविकांत वरपेंच्या या एका पोस्टमुळे हा मुद्दा प्रसारमाध्यमांकडून चांगलाच लावून धरण्यात आला आहे. सदर फोटोमध्ये खा. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले दिसत असून आजूबाजूला काही लोकांचा घोळका दिसून येत आहे. शिंदेंच्या खुर्चीमागे ‘महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री’ असे लिहिलेले असून या बोर्डच्या अगदी वरच्या बाजूस बाळासाहेबांचा फोटो टांगलेला दिसत आहे, त्यामुळे ही नेमकी कोणती जागा असा संभ्रम अनेकांना पडला आहे. जागा कोणतीही असली तरीही श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून नेमकं काय करताहेत असा सुद्धा प्रश्न अनेकांना वारंवार पडत आहे.

वेगळा शिंदे गट स्थापन केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधीच वादात सापडलेले असताना त्यांच्या लेकाचा हा प्रताप नेटकऱ्यांसाठी सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यावर अनेकजण गमतीशीर कमेंट सुद्धा करीत आहेत. त्यामध्ये एकाने “काहीही बोलता का तुम्ही साहेब शिंदे साहेब सहा पर्यंत काम करतात ना मग त्या नंतर हे” असे म्हणून एकनाथ शिंदेची अक्षरशः खिल्ली उडवली आहे, तर दुसऱ्याने “मुख्यमंत्री पदाचा मान प्रतिष्ठा गौरव काही उरला नाही महाराष्ट्रात कोणी कधी माईक हिसकावून घेतो कोणी कागद समोर ठेऊन काय बोलायचे हे सांगतात कोणी खुर्ची वर बसुन जातो कोणी इशारे करून खिल्ली उडवतो”, असे म्हणून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी