29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
HomeमनोरंजनWorld Cinema Day : आता केवळ 75 रुपयांत सिनेमागृहात पाहता येणार सिनेमा

World Cinema Day : आता केवळ 75 रुपयांत सिनेमागृहात पाहता येणार सिनेमा

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने प्रेक्षकांना खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. 23 सप्टेंबर रोजी तुम्ही फक्त 75 रुपयांमध्ये देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने प्रेक्षकांना खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. 23 सप्टेंबर रोजी तुम्ही फक्त 75 रुपयांमध्ये देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी सिनेमा दिन साजरा केला जाणार होता, परंतु नंतर त्याचा दिवस 23 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला. यापूर्वी देशात चित्रपट दिन साजरा केला जात नसल्यामुळे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे कोरोना महामारीनंतर सिनेमागृहातून हरवलेला प्रेक्षक पुन्हा सिनेमागृहाची वाट धरण्यासाठी उत्सुक होईल. त्यामुळे एकदंरीत एमआयएने सुरू केलेल्या उपक्रमातून प्रेक्षकांचा आणि पर्यायाने सिनेसृष्टीचा फायदा होईल हे निश्चित.

कोरोना युगापूर्वी, जिथे दर वीकेंडला सिनेमागृहात प्रचंड गर्दी जमायची, तिथे अनेकदा प्रेक्षकांना तिकीट खिडकीतून निराश होऊन परतावे लागले. पण जेव्हापासून कोरोना महामारीने लोकांना त्यांच्या घरात कैद केले, तेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतःच मनोरंजनाचे साधन बनले. हळूहळू याची चव इतकी वाढली की लोकांनी थिएटरमध्ये जाणे बंद केले, ज्याचा थेट परिणाम चित्रपट निर्मितीवर होत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने सुमारे 4 हजार चित्रपटगृहांमध्ये केवळ 75 रुपयांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा…

ODI IND vs AUS : भारताच्या पुनरागमनात पावसाचे विघ्न! वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

Raj Thackeray : … तर महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील, राज ठाकरेंचा इशारा

Wine Sale : मॉल्समध्ये वाईन विक्रीसाठी भाजपची संमती आवश्यक, शिंदे गट करणार मनधरणी

सिनेमागृहांचे पुनरुज्जीवन करण्याचा एमआयएचा प्रयत्न

कोरोना महामारीमुळे संपूर्ण उद्योगधंदे प्रभावित झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृहे पूर्णपणे बंद होती. लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना 50 टक्के ऑक्युपन्सी नियमाने चित्रपटगृहे उघडण्यात आली. त्याच वेळी, चित्रपटसृष्टी देखील वाईट टप्प्याला तोंड देत पुन्हा एकदा उदयास येण्याच्या प्रयत्नात आहे. बर्‍याच दिवसांनी चित्रपट बनून प्रदर्शित होत असले तरी चित्रपटगृहात शांतता आहे. पूर्वीचे वैभव परत येत नाही.

एमआयए मध्ये 4 हजार स्क्रीन

सिनेमाच्या दिवशी स्वस्त तिकिटे मिळण्याचा मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया एफआयसीसीआय म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अंतर्गत येते. त्याची स्थापना 2002 मध्ये झाली. देशभरात 4,000 स्क्रीन्स असलेल्या या असोसिएशनशी सुमारे 500 मल्टिप्लेक्स संबंधित आहेत.

दरम्यान, एमआयएच्या या उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना सिनेमा पाहण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. शिवाय हा उपक्रम यशस्वी झाल्यास कोरोना महामारीनंतर सिनेमागृहातून हरवलेला प्रेक्षक पुन्हा सिनेमागृहाची वाट धरण्यासाठी उत्सुक होईल. त्यामुळे एकदंरीत एमआयएने सुरू केलेल्या उपक्रमातून प्रेक्षकांचा आणि पर्यायाने सिनेसृष्टीचा फायदा होईल हे निश्चित.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी