32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजन'पी-टाउन ते बी-टाउन' कसा आहे Bigg Boss १6 विजेता एमसी स्टॅनचा प्रवास?...

‘पी-टाउन ते बी-टाउन’ कसा आहे Bigg Boss १6 विजेता एमसी स्टॅनचा प्रवास? जाणून घेऊयात

एमसी स्टॅन (MC Stan) मुळं नाव अल्ताफ शेख-दळवी असलेल्या या पुण्याच्या पट्ठ्याने यंदाच्या पर्वात विजय मिळवून बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले आहे. या शोमध्ये प्रियंका चाहत चौधरी आणि शिव ठाकरे यांच्यात चांगलीच चुरस रंगत होती, पण शेवटच्या क्षणी मोठी उलथापालथ झाली आणि प्रियांका तिसऱ्या क्रमांकावर राहिली. सगळ्यांना मात देत एमसी स्टॅन सीझनचा उमेदवार बनला आहे. मराठमोळ्या शिव ठाकरेला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे विजेत्या एमसी स्टॅनला बिग बॉस 16 ची ट्रॉफी, 31 लाख रुपये आणि ग्रँड i10 Nios कार बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. हिरे आणि सोन्यापासून जडलेल्या या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे.

ऑक्टोबर 1, 2022 रोजी सुरू झालेल्या बिग बॉस 16चे पर्व अखेर काल (12 फेब्रुवारी 2023 रोजी) संपले असून या 19 आठवड्यांच्या दीर्घ पर्वाला पूर्णविराम मिळाला आहे. लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने बिग बॉस 16 मधून अधिक लोकप्रियता मिळवली. त्याच्या बोलण्याची स्टाइल अनेकांना भावली. गेल्या काही दिवसांत त्याचा खेळही सुधारला होता. बिग बॉस 16 च्या घरात एन्ट्री केली आणि एन्ट्रीसोबतच स्टॅनने होस्ट सलमान खानचे मन जिंकले. एमसी स्टॅनच्या कठीण प्रसंगातील संघर्षापासून ते लहान वयाच्या यशापर्यंतची कहाणी ऐकल्यानंतर सलमान खानने देखील त्याचे कौतुक केले. असा बिग बॉस 16 चा विजेता ठरलेला एमसी स्टॅन आहे तरी कोण? आज आपण ते जाणून घेऊया.

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

पुणेकर असलेल्या स्टॅनला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणं गायलं आहे. दरम्यान ‘वटा’ या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या गाण्याला युट्यूबवर 21 मिलियन व्हू्यूज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे 23 वर्षीय एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. रॅप गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो दर महिन्याला लाखो रुपये कमावतो. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एमसीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कुटुंबियांनीदेखील त्याला त्याच्या वेगळ्या पद्धतीच्या गाण्यांमुळे अनेकदा टोमणे मारले. पण तरीही त्याने त्याची आवड जोपासली आणि आज त्याची गाणी लोकप्रिय झाली असून तो सध्या एक प्रसिद्ध रॅपर आहे.

MC Stan wins Bigg Boss 16; takes home trophy and Rs 31 lakh prize money | Tv News – India TV

एमसी स्टॅनचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. सुरुवातीला त्याला कुटुंब आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले कारण स्टॅन अभ्यासापेक्षा गाण्यावर आणि रॅपकडे जास्त लक्ष देत असायचा. एक काळ असा होता की स्टॅनकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागल्या होत्या. पण एमसी स्टॅनने हार न मानता यशाचे शिखर गाठले आहे. जे पूर्वी एमसी स्टॅनकडे तिरस्काराने बघायचे, ते आज स्टॅनचे कौतुक करताना थकत नाहीत.

एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या गायकांना पिछाडलं होतं. याच कारणामुळे एमसी स्टॅन लोकांच्या निशाण्यावर आले. नंतर, एमसी स्टॅनने अस्तगफिरुल्ला नावाचे एक गाणे रिलीज केले, ज्यामध्ये त्याने आपला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल सांगितले. या गाण्याने एमसी स्टॅनबद्दल लोकांचा समज बदलला.

हे सुद्धा वाचा : Bigg Boss Hindi : काँग्रेस नेत्याने उचलला मराठमोळ्या शिव ठाकरेवर हात !

Bigg Boss Marathi : मिसेस उपमुख्यमंत्री ‘बिग बॉस मराठी’च्या घरात

PHOTO: बिग बॉसमधील सलमान खानचे काही खास क्षण ज्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

एमसी स्टॅनवर काही महिन्यांपूर्वी प्रचंड टीका झाली होती. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हणजे औझमा शेखने त्याच्यावर आरोप केले होते. या आरोपात ती म्हणाली होती,”एमसी स्टॅनने माझ्या मॅनेजरला मला मारहाण करण्यास सांगितले आहे”. या आरोपांचा एमसी स्टॅनच्या इमेजवर परिणाम झाला होता. त्यामुळेच त्याने बिग बॉसचा खेळ खेळण्याचं ठरवलं. एमसी स्टॅन एक रॅपर म्हणून लोकप्रिय असण्यासोबत त्याचे नेकपीस आणि शूजदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. ‘बिग बॉस 16’च्या प्रीमियरला तो 70 लाख किंमत असलेला नेकपीस आणि 80 हजार रुपयांचा शूज घालून आला होता. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला कमी रुची दाखवणाऱ्या ‘मंडलीचा सदस्य’ स्टॅनने खेळाच्या काही शेवटच्या आठवड्यांत सक्रियता दाखवून त्याने त्याच्या प्रचंड चाहता वर्गाचे मन जिंकले आणि बिग बॉस 16 पर्वात विजय मिळवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी