30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयविराटची स्वाक्षरी पाहून ऋषी सूनक काय म्हणाले?

विराटची स्वाक्षरी पाहून ऋषी सूनक काय म्हणाले?

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक (Rishi Sunak) भारतीय वंशाचे आहेत, हे सर्वांनाच ठावूक आहे. शिवाय इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या कन्येशी ऋषी सूनक यांचा विवाह झाला आहे. त्यामुळे ते नारायण मूर्ती यांचे जावईदेखील आहेत. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे त्यांना दिवाळी निमित्तानं दिलेली भेटवस्तू आणि त्यावरील विराट कोहलीची स्वाक्षरी. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी काल (१२ नोव्हेंबर) सपत्निक ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांची लंडनमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना दोन भेटवस्तू दिल्या. त्या पाहून सूनक आणि त्यांची पत्नी अक्षता यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खास दिवाळीच्या निमित्तानं ऋषी सूनक यांची त्यांच्या १० डाऊनिंग स्ट्रीट (10 Downing Street) या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जयशंकर आणि त्यांच्या पत्नी क्योको जयशंकर यांनी सूनक दांपत्याची भेट घेऊन त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छाही सूनक यांच्यापर्यंत पोहोचवल्या. यावेळी जयशंकर यांनी ऋषी सूनक यांनी गणपतीची मूर्ती भेट दिली. शिवाय भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याची स्वाक्षरी असलेली बॅटदेखील (bat with Virat Kohli’s autograph) सूनक यांना भेट दिली.

हे आगळी दिवाळी भेट पाहून ऋषी सूनक भारावून गेले. त्यांनी विराटच्या बॅटिंगचे कौतुक करत दोन्ही भेटवस्तूंचा स्वीकार केला. या भेटीत ऋषी सूनक यांनीही ब्रिटनमधील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सूनक यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली होती. भारत आणि ब्रिटन यांच्या संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. आता तर भारतीय वंशाचे पंतप्रधान ब्रिटनला लाभल्यामुळे संबंध आणखी दृढ झाले आहेत. या भेटीनंतर खुद्द ऋषी सूनक यांनी जयशंकर यांना दरवाजापर्यंत जात निरोप दिला. त्याबद्दल जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

यानंतर एस. जयशंकर यांनी सपत्निक लंडनमधील बीएपीएस डॉ.स्वामीनारायण मंदिराला (BAPS Shri Swaminarayan Mandir) भेट दिली आणि शांतता, सुसंवाद आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. बीएपीएस डॉ.स्वामीनारायण मंदिर हे युरोपमधील हिंदू पद्धतीने बांधलेलं पहिलं अधिकृत मंदिर आहे.

हे ही वाचा

विराटच्या गोलंदाजीवर अनुष्काला हसू आवरेना

500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ‘हे’ भारतीय फलंदाज टॉप फाईव्ह

‘देवी’च्या जन्मानंतर बिपाशा बासूचं काय झालं पाहा?

एस. जयशंकर शनिवारी ब्रिटनमध्ये दाखल झाले. १५ नोव्हेंबरपर्यंत ते ब्रिटनमध्ये असून या कालावधीत ते अनेक उच्चपदस्थांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी