30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयवडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा भाजपवर निशाण, लवकरच आणखी घोटाळे बाहेर काढू

वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा भाजपवर निशाण, लवकरच आणखी घोटाळे बाहेर काढू

 टीम लय भारी

मुंबई :कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेतलं. नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.(Sana Malik targets BJP after father’s arrest)

नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर मलिकांची मुलगी सना मलिकने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्यावर जितके आरोप होतील, तितकी अधिक ताकद आम्हाला मिळेल अशी भूमिका सना मलिक यांनी घेतली आहे.

नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे त्यांचं तोंड बंद करण्यासाठी ईडीने कारवाई केली यात शंका नाही, असा घणाघात सना मलिकने केला आहे. यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढू, असा इशारा सना मलिक यांनी दिला आहे.

माझे वडील 30 वर्षांपासून राजकारणात आहेत. आता त्यांच्यावर थेट टेरर फंडिंगचा आरोप झाला. आम्हाला जितका दाबण्याचा प्रयत्न कराल तितके आम्ही उसळून येऊ आणि कणखरपणे लढू, असं वक्तव्य सना मलिक यांनी केलं आहे

हे सुद्धा वाचा

“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल, नवाब मलिकांचे धक्कादायक वक्तव्य

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक

Nawab Malik’s sister on his arrest: “BJP unsettled with opposition…”

 

 

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी