28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयगद्दारांना जनताच रस्त्यावर पकडून मारणार : संजय राऊत

गद्दारांना जनताच रस्त्यावर पकडून मारणार : संजय राऊत

गद्दारांना रस्त्यावर पकडून मारले पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. हाच विचार आता राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे, त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरविण्यात आली आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर तोफ डागली.

ते म्हणाले, बाळासाहेबांबाबत बोलण्याचा एकनाथ शिंदे यांना कोणताही अधिकार नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले. बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे, त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे.

अयोध्या दौऱ्यात रामाच्या दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता. आम्ही अनेकदा अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेतले . आमच्यावर ही शिंदे गटाची टोळी होती. त्यामुळे दर्शन आणि शक्तीप्रदर्शन यातला फरक समजून घेणे गरजेचे आहे. शक्तीप्रदर्शन करायला अयोध्येला जायची गरज नाही. ठाण्यातील नाक्यावरही शक्तीप्रदर्शन करता येते, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

देशातील पहिलाच भन्नाट अभ्यासक्रम, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी !

काय आहे जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करायची तिबेटी परंपरा?

जेवणाचा डब्बा पडला 89 हजारांना, वीज बिलाच्या नावाखाली दीड लाखांना चुना

दरम्यान, माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नसल्याचे राऊत यांनी म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी