27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय'?

‘सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय’?

देशात नवीन संसद बांधल्यानंतर नवीन संसदेत कामकाज होत आहे. मात्र नवीन संसदेत ३ अज्ञात तरूणांनी संसदेच्या गॅलरीतून उडी घेतल्यानं गोंधळ उडू लागला आहे. या तरूणांना पकडण्यात आले आहे. मात्र अचानक घडलेल्या घटनेनं सर्वजण चकित आणि भयभीत झाल्याचे चित्र समोर येत आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १३ डिसेंबर दिवशी थेट २१ वर्षांमागे असाच प्रकार घडला होता आणि त्या हल्ल्याला आजच्याच दिवशी २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान नवीन संसदेच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. यावेळी दोघांना ताब्यात घेतले आणि अन्य लोकांनी घुसखोरी केली. यामुळे काही वेळ संसदेत भीतीचे वातावर तयार झाले आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

संसदेवर झालेल्या हल्ल्यात रोहित पवार यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. २२ वर्षांआधी हा हल्ला झाला होता. आजही हल्ला झाला आहे. दोघांनी संसदेच्या गॅलरीतून येत उडी मारत लोकसभेत गोंधळ घातला आहे. ही अंत्यंत सुरक्षिततेतील त्रुटी असणारी बाब आहे. सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नाही तर देशाचं काय? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही, असे म्हणत रोहित पवारांनी सरकारवर हल्ला केला आहे.

हे ही वाचा

अतूल सावेंच्या प्रयत्नाने ओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची तरतूद

लक्ष्मीकांत बेर्डेंचे भाऊ रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

‘भाजपा वाजपेयींची राहिली नाही’

दरम्यान, २२ वर्षामागे गेल्यास १३ डिसेंबर २००१ साली देशाच्या संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळ्यांच्या हल्ल्याने गंभीर वातावरण झालं होतं आणि गोळ्यांच्या आवाजाने संसदेत शांतता पसरली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी काही दहशतवाद्यांना मारले गेले. त्याचीच पनुनरावृत्ती पुन्हा एकदा त्याच दिवशी उदयाला आली. अलीकडे खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंहने संसद भवनावर हल्ला करणार असल्याची धमकी दिली होती. संसदेची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली. मात्र संसदेच्या बाहेर दोन आंदोलक घोषणाबाजी करताना एक पुरूष आणि महिलेला होती.

युवक लोकसभा सभागृहात घुसले. या दोघांनी गॅलेरीतून उडी मारली. त्यांनी सभागृहात काही तरी फेकलं. यामुळे सभागृहात धूर बाहेर येऊ लागला. या तरूणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे. धुरामुळे संसदेमध्ये श्वास घेणं अवघड झालं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी