27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयरोहित पवारांनी सही केलेलं पत्र गेलं चोरीला?

रोहित पवारांनी सही केलेलं पत्र गेलं चोरीला?

राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटात राडा सुरू आहे. अजित पवारांनी भाजपशी युती केली असून सत्तेवर उपमुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका बजावत काम करत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबद्दल गौप्यस्फोट केला आहे. मी अजितदादांना विरोधीपक्षनेता बनवण्यासाठी पत्रावर सही केली होती. मी इतर कोणत्याही पत्रावर सही केली नसल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. मात्र मी सही केलेलं ते पत्रच नाही. दुसऱ्या पत्रावर अनेकांनी सही केली होती, मात्र मी सही केली नसल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी समाजात आपली पत पाहावी. अजितदादांना विरोधीपक्षनेते करण्यासाठी सही केली होती. मात्र ते पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरले गेले आहे. यामुळे हा प्रकार पत्र चोरीला गेल्यासारखाच असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यानंतर त्यांनी आरक्षणावर भाष्य केलं आहे.

राज्य सरकार आरक्षण मार्गी लावणार का?

आरक्षणाचा मुद्दा काही महिन्यांपासून राज्यात सुरू आहे. यावर आता रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक सांगतात, तर देवेंद्र फडणवीस दुसरं सांगतात आणि भुजबळ, केसरकर, विखे-पाटील वेगवेगळं सांगतात. यामुळे गोंधळ उडू लागला आहे. हा गोंधळ मिटवण्यासाठी राज्यसरकारने भूमिका स्पष्ट करावी की हे सरकार आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार की केंद्राकडे जावं लागणार? असा सवाल आता रोहित पवारांनी राज्यसरकारला केला आहे. अजित पवार गटातील काही प्रवक्ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांच्या काही गोष्टी काढल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे म्हणत रोहित पवारांनी विरोधकांवर टीका केली आहे.

हे ही वाचा

लक्ष्मीकांत बेर्डेंचे भाऊ रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

धनगर आरक्षणाच्या मोर्च्याहून परतताना धनगर बांधवांचा मृत्यू

‘निवडणुकांपूर्वी सरकार जुन्या पेन्शनवर निर्णय घेणार’

विरोधक असल्यासारखं का बोलता?

भुजबळ हे काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर सभा घेत आहेत. यावर रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. भुजबळ यांच्याकडे संवैधानिक पद दिलं असलं तरीही ते समाससुधारक असल्यासारखं आणि विरोधक असल्यासारखं भाषण करत आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करावा, लोकांच्या मनात गोंधळ होत आहे. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत गृहमंत्र्यांच्या हातात गुन्हे मागे घेण्याचे अधिकार असतात. आमच्या काळात अमित देशमुखांनी केलं होतं. फडणवीस साहेबांना शब्द देऊनही शब्द पाळत नसतील तर फायदा काय? असे म्हणत रोहित पवारांनी विरोधकांची शाळा घेतली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी