24 C
Mumbai
Saturday, February 24, 2024
Homeमहाराष्ट्र'अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले'?

‘अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले’?

शिक्षणव्यवस्थेवर सत्ताधारी पक्षातील नेते नेहमीच काहीना काही बोलत असतात. काही दिवसांपूर्वी बीड येथे झालेल्या एका सभेत राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना एका महिलेनं शिक्षक भरतीबद्दल विचारले असता, दिपक केसरकरांनी त्या महिलेला शिक्षक भरतीतून बरखास्त करू असे वक्तव्य केलं होतं, त्याचप्रमाणे आपल्यात बेशिस्तपणा असेल तर आपण सरकारी नोकरीवर येऊ शकत नसल्याचं वक्तव्य दिपक केसरकरांनी केलं आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पीएचडी करणाऱ्या मुलांना पीएचडी करून काय करणार आहात? असा सवाल केला होता, यावर आता पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी अजित पवारांचे कान टोचत प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले?

अजित पवारांनी केलेल्या पीएचडीच्या वक्तव्यावर अनेक पीएचडीचे विद्यार्थी संतापले आहेत. आपण उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले? असा सवाल आता उपस्थित केला आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थांनी अजित पवारांनी केलेला वक्तव्याचा धिक्कार केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीच्या राजकारणावर एखादा विद्यार्थी संशोधन करेल का? अशी भीती अजित पवारांना वाटत आहे. संशोधन करण्यासाठी फेलोशिप मिळवणं गरजेचं आहे. आतापर्यंत पीएचडी केलेल्या सर्वांचा अजित पवारांनी अपमान केला आहे.

हे ही वाचा

‘सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय’?

अतूल सावेंच्या प्रयत्नाने ओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची तरतूद

लक्ष्मीकांत बेर्डेंचे भाऊ रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

सारथीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांपासून फेलोशिप देण्यात यावी, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे. सरकारने २०० विद्यार्थांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. फेलोशिप पुढील वर्षापासून सरकसकट विद्यार्थांना देण्यात यावी, विद्यार्थांनी केलेली तयारी लक्षात घेऊन हा शासन निर्णय पुढील वर्षांपासून लागू करावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

यानंतर त्यांनी शाहू महाराजांचे म्युझिअम कधी सुरू होणार? तसेच सारथीच्या विद्यार्थ्यांचे वसतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार? असे काही प्रश्न सतेज पाटील यांनी उपस्थित केले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थांना संस्थेकडून शैक्षणिक सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती, सतेज पाटील यांनी दिली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी