29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयशरद पवार लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर संतापले, आणि म्हणाले...

शरद पवार लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर संतापले, आणि म्हणाले…

टीम लय भारी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यात शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराबाबत संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या हिंसाचारावर संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार असंवेदनशील आहे, अशा शब्दात पवार यांनी संताप व्यक्त केला आहे (Sharad Pawar got angry over Lakhimpur Kheri violence case).

या हिंसाचारात जीव गेलेल्या शेतकऱ्यांची जबाबदारी ही पूर्णपणे केंद्राची व उत्तर प्रदेश सरकारची आहे. तसेच या हिंसाचाराचा मी निषेध करतो. या प्रकरणाची चौकशी व तपास हा झालाच पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झालंच पाहिजे. या सर्व प्रकरणातून केंद्र सरकारची नियत काय आहे ते दिसून येत आहे. त्यांच्याकडे आज हुकूमत आहे म्हणून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. असे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांचे तरूणांच्या कल्याणासाठी मोठे पाऊल

नवी दिल्लीत ते पत्रकारांशी संवाद साधत होते, त्यावेळी ते बोलत होते. “केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाहीये.जालियनवाला बाग मध्ये कशी परिस्थिती झाली होती तशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे”, असंही पवार म्हणाले.

शरद पवार लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर संतापले, आणि म्हणाले...

Sharad Pawar : ‘शेतकरी दिना’निमित्त शरद पवारांचं खास Tweet ! म्हणाले…

Nitin Gadkari has shown how power can be used: Sharad Pawar

शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, “दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांतीने आंदोलन सुरू आहे, मात्र २६ जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. लखीमपूर इथं जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते, आमच्या मागण्या मांडत होते. मात्र त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो”.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी