30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयओबीसींची जातीनिहाय जनगणना करा :  शरद पवार

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा :  शरद पवार

टीम लय भारी

मुंबई: मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा पार पाडल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ओबीसी आरक्षाणावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला.शरद पवार यांनी केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली आहे. म्हणजे देशाला कळून जाऊ द्या की नक्की ओबीसींची किती लोकसंख्या आहे. Sharad Pawar on OBC reservation

या संख्येच्या आधारावर न्यायाची वाटणी करा. इथं कुणी काही फुकट मागत नाही. जो अधिकार आहे न्यायाचा तो अधिकार मिळाला पाहिजे. तो किती मिळाला पाहिजे हे ठरवायचं असेल तर या प्रकारची जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय पर्याय नाही.पुढे ते म्हणतात की, देशात जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्याच्या हातात देशाची सूत्र आहेत ते करतील असे वाटत नाही, आपल्याला एकत्र याव लगेल असं ही ते म्हणाले. रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्यांच्या हातात राज्य त्यांची मानसिकता वेगळी असल्याचे पवार (Sharad Pawar)  यांनी म्हटले आहे.

ओबीसींची अशी जनगणना झली तर समाजातील एकी प्रखर होईल, देशात चुकीचं वातावरण निर्माण होईल असं समजत आहेत. मात्र, सत्य समोर आल तर चुकीचं वातावरण होईल?? वस्तुस्थिती समोर आली तर अस्वस्थता येईल? असा प्रश्ना उपस्थित करत ओबीसी जनगणना ही राष्ट्रवादीची मागणी असल्याचंही पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा: 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला मोर्चा म्हणजे निव्वळ ढोंग : नाना पटोले

Want to create Opposition alliance to oppose BJP: Kapil Sibal as he quits

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी