33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयमुंबईला पुरापासून वाचविण्याची गरज, शिवसेना आमदाराने सुचविला भन्नाट उपाय

मुंबईला पुरापासून वाचविण्याची गरज, शिवसेना आमदाराने सुचविला भन्नाट उपाय

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी ४ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (Shiv Sena MLA Sunil Prabhu met C.M. Uddhav Thackeray). यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचून निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांना उपाय सांगितला.जमिनीखाली पेटी जलवाहिनी व जलसंचयन बोगदे बनवण्यासाठी तांत्रिक सल्लागारांची नेमणूक करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली.

प्रभू यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पावसाळ्यात चार ते पाच तासात ढगफुटी पाऊस पडतो.त्यामुळे समुद्राला मोठी भरती व लाटा उसळतात.यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने नाले तुंबणे , मिठी नदी सह अनेक मोठ्या नद्यांना पूर येणे अशी परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने सखल भागात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी पंपींग स्टेशनसह ब्रिटिश काळातील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.

उपमुख्यमंत्र्यांसोबत केले पुणे मेट्रोचे उद्धघाटन, त्याच मेट्रो एमडीवर राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

शरद पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार

मुंबईच्या बदलत्या भौगोलिक रचनेमुळे ५० मि. मि. पेक्षा जास्त पाऊस पडल्यावर नाले व जलवाहिन्यांमध्ये पाणी वाहून नेण्याची क्षमता नाही आहे असे अभ्यासातून समोर आले. तसेच आता पाणी निचरा होण्यासाठीच्या पाणलोट क्षेत्रात कॉंक्रीटीकरण झाले आहे.त्यामुळे जमिनीत पाणी मुरून निचरा होण्याचे प्रमाण हे कमी झाले आहे.

Shiv Sena MLA Sunil Prabhu met CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नीरज चोप्राने भाला फेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत मिळवले स्थान

Uddhav Thackeray govt, governor lock horns, yet again

जपानची राजधानी असलेल्या टोकीयोमध्ये पूरपरिस्थितीवर उपाय म्हणून जमिनीखाली टाक्या आणि बोगदे बांधण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे सँण्डहर्स्ट रोडच्या रेल्वे ट्रॅक खालून भूमीगत जल बोगदा बांधून ते पाणी बॉक्स ड्रेनद्वारे पर्जन्य जलवाहिनी मध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर आता पुरमुक्त झाला. याच पद्धतीने पाणी साचणारे भाग निश्चीत करून ते पाणी जमिनीखाली असलेल्या जल संचयन बोगद्यात साठविले जाऊ शकते. म्हणून जमिनीखाली पेटी वाहिनी व जल संचयन बोगदे हे अत्यावश्यक आहेत आणि त्यासाठी तांत्रिक सल्लागारांची नेमणूक करावी अशी मागणी प्रभू यांनी केले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेला या संदर्भात आदेश देण्यात यावेत असा सल्ला प्रभु यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी