30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयशिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

टीम लय भारी

पुणे:- पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला केला. यात झालेल्या धक्काबुक्कीनंतर किरीट सोमय्यां यांना  जखमा झाल्याचं आढळून आलं आहे. आणि या सर्वामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय भाजपच्या नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला असून आता भाजप या प्रकरणावर कारवाईची मागणी  करत आहे.(Shiv Sena’s intention kill me, Shocking allegation Kirit Somaiya)

या दरम्यान किरीट सोमय्या यांना रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेत्यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी हात पाय तोडण्याचे आदेश होते असा सरकारवर आरोप केला आहे. “शारिरीक इजा फार झालेली नाही. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या यांचा धक्कादायक आरोप, संजय राऊत यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा? किरीट सोमय्यांचा राऊतांना टोला

FIR registered against 8 Shiv Sena leaders including Sanjay More for assaulting Kirit Somaiya in Pune

अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. अशा प्रकारचा कट त्यावेळी रचला गेला असावा, आणि हे सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला गेला असावा. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता. हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती,” असंही ते म्हणाले आहेत.

“स्थानिक पोलीस नाही तर मुख्यमंत्री कार्यालय सुद्धा यामागे होतं. मुख्यमंत्री कार्यालयातून संजय राऊत, अनिल परब आणि पाटणकर या तिघांना वाचवण्यासाठी किरीट सोमय्याला दोन चार महिने शांत करण्याचा कट होता. किती मोठे दगड हातात होते. शनिवारी सुटु्टी होती. एक कर्मचारी कामावर नव्हता. मग हे १०० लोक आत कसे घुसले? शिवसेनेचे कार्यकर्ते हातात काठ्या दगड घेऊन कसे पोहोचले? झेड सेक्युरिटी असणाऱ्या व्यक्तीसाठी पोलिसांनी आधी जाऊन पाहणी करायची असते. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच सीआयएसएफ कमांडो आत जाता. हे सर्व त्यांनी मिळून केलं,” असाही आरोप सोमय्यांनी केला.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी ट्वीटही केलं असून आपली हत्या करण्याचा हेतू होता असा आरोप केला आहे. सोबत त्यांनी एक व्हिडीओही जोडला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीच्या हातात मोठा दगड दिसत आहे. किरीट सोमय्या हे  पालिका आणि पोलीस आयुक्तांशी बोलले आहेत. त्यांनी  गृहसचिवांना पत्र देखील  लिहिलं आहे. शिवाय या संदर्भात राज्यपालांची भेट घेऊन,  कारवाईची मागणी करणार आहे. स्थानिक पोलीस अधिकारी, पालिकेचा सुरक्षा प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. व यावर मुख्यमंत्री कार्यालयाने जाब दिला पाहिजे,” असंही ते म्हणालेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी