28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरराजकीयShivsena Vs Shindesena : 'धनुष्यबाण' ही निशाणी शिंदे गटालाच मिळणार, शिंदे गटाचे...

Shivsena Vs Shindesena : ‘धनुष्यबाण’ ही निशाणी शिंदे गटालाच मिळणार, शिंदे गटाचे ठाम मत

शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे मुळ शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत, परंतु शिवसेनेचे नाव वापरून सत्तेत विराजमान झालेले शिंदे गट ठाकरे गटासमोर हा पेच आणखी वाढवत आहे, त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडानंतर शिवसेनेतील अनेक बडे नेते, आमदार, खासदार यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. शिवसेना नेत्यांची मोठी फळीच बाहेर पडल्याने त्यांनी लगेचच आपणच शिवसेना असल्याचा दावा करण्यास सुरूवात केली आणि शिंदे आणि ठाकरे यांच्यात एकच कलह सुरू झाला आणि प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सत्तांतराच्या नाट्यानंतर अनेक कारणांनी शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली असली तरीही आता शिवसेना नेमकी कोणाची हा पेच सोडवण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आता आमने – सामने आले आहेत. दरम्यान या संपुर्ण परिस्थितीवर भाष्य करताना भरत गोगावले यांनी केलेल्या एका दाव्याने आता खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी या संपुर्ण परिस्थितीवर भाष्य करताना काही महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यावेळी गोगावले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल. या प्रकरणाचा फैसला चार ते पाच वर्ष लांबेल, तरीही धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल, असा दावाच त्यांनी यावेळी केला, त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयाकडून तारीख पे तारीख देण्यात येत असल्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीस विलंब होत आहे. त्यावर 23 ऑगस्ट नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रमणा यांनी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवले.

हे सुद्धा वाचा…

Congress President Election : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली? वाचा सविस्तर…

Asia Cup 2022 : भारत – पाकिस्तानच्या सामन्यात आता नवा ‘ट्विस्ट’, भारतीय संघात मोठे बदल

Fraud Case : ‘हॅलो, हाय ब्रो…मी आदित्य ठाकरे’ तोतया व्यक्तीकडून फसवणूकीचा प्रयत्न

रविवारी एका सभेत भरत गोगावले यांनी शिवसेनेवर बोलताना काही वक्तव्य केलं होतं. त्यावेळी गोगावले म्हणाले, अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, असे म्हणून गोगावले यांनी ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे.

शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे मुळ शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत, परंतु शिवसेनेचे नाव वापरून सत्तेत विराजमान झालेले शिंदे गट ठाकरे गटासमोर हा पेच आणखी वाढवत आहे, त्यामध्ये भरत गोगावले यांनी केलेले वक्तव्य यामुळे तर ही बैचेनी आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात सुद्धा यावर उलट सूलट चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी