31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या शपथ घेणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या शपथ घेणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बंपर यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या कि डी.के. शिवकुमार हा तिढा होता. मात्र काँग्रेसने हा तिढा सोडवत सिद्धरमय्या यांच्याकडे मुख्यमंत्रूपदाची धुरा सोपवत डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. दोन नेत्यांमध्ये सुरु असलेल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच आता संपुष्टात आली असून 20 रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

डी.के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. गेले दोन तीन दिवस मुख्यमंत्रीपद कुणाकडे यावर काँग्रेसमध्ये बैठकांवर बैठका सुरु असताना काँग्रेसला हा तिढा सोडविण्यात यश आले असून सिद्धरमय्या यांच्यानावावर शिक्कामोर्तब झाले आहे. डी.के. शिवकुमार हे काँग्रेसचे संकडमोचक समजले जातात. काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून त्यांची देशभरात ओळख आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा असल्याची चर्चा होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून जास्तीजास्त संख्येने काँग्रेचे खासदार निवडूण आणण्याची काँग्रेसची रणनिती आहे. त्यासाठी सिद्धरमय्या यांचा चेहरा काँग्रेसला महत्त्वाचा वाटत असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कर्नाटकातील अल्पसंख्यांक समाज, ओबीसी समाज आणि दलित समाजात सिद्धरमय्या यांचा प्रभाव आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत या समाजाचा घटकांचा काँग्रेसला पाठिंबा मिळावा यासाठी काँग्रेसने सिद्धरमय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कर्नाटकातून 28 खासदार लोकसभेवर निवडूण जाातात, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने बहुसंख्य खासदार कर्नाटकातून लोकसभेवर निवडून आणले. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागल्यामुळे कर्नाटकातील बदललेल्या वाऱ्याचा पुरेपुर फायदा घेण्याच्या तयारीत काँग्रेस आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कर्नाटकमध्ये भाजपची चांगली पकड आहे. मात्र आता दक्षिणेतील राज्यांमधून भाजप हद्दपार झाली आहे, आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातून भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी काँग्रेस करत आहे. त्यामुळे मुख्यंमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. डी.के. शिवकुमार हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांची देखील मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाने दोन्ही नेत्यांमध्ये सामोपचाराने चर्चा करुन मार्ग काढत सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा केली. डी.के. शिवकुमार यांनी देखील त्यासाठी काँग्रेस नेतृत्वाच्या निर्णयाला सहमती दर्शविली असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा

आता बैलगाडा शर्यतींचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

अंधश्रद्धेचं भूत..करणी केल्याच्या संशयावरून शेजाऱ्याला संपवलं

आता चित्रपटगृहांना मराठी चित्रपट दाखवण्याची सक्ती!

सिद्धरमय्या यांची कर्नाटकातील ग्रामीण भागावर मजबूत पकड आहे. ते दलित नेते असल्याने दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजात त्यांचा प्रभाव आहे. या सर्व गोष्टीचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विचार करुन सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कर्नाटकातून जर लोकसभेसाठी काँग्रेसचे जास्तीजास्त उमेदवार निवडून आणण्यात काँग्रेसला यश आले तर, दक्षिणेतील कर्नाटक या एकमेव राज्यात भाजपचा असलेला प्रभाव कमी करण्यात काँग्रेस यशस्वी ठरेल. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशाचा फायदा आता लोकसभा निवडणुकीत देखील करुण घेण्याची काँग्रेसची रणनिती असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी