टीम लय भारी
मुंबई: देशात वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या महागाईवरूनच भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांना काँग्रेसच्या (congress) नेत्या नेत्ता डिसुझा यांनी थेट विमानातच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दोन्ही नेत्यामध्ये वाद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. काँग्रेसच्या नेत्या नेत्ता डिसुझा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. Smriti irani face off with netta Dsouza in flight
इराणी या विमान प्रवास करत होत्या. सहप्रवासी स्मृती इराणींना (Smriti irani) ”हॅप्पी बिहू” म्हणत शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याला इराणी यांनीही उत्तर दिले. डिसुझा इराणींना म्हणाल्या, ‘हॅप्पी बिहू गॅस शिवाय.., स्टोव्ह शिवाय..?’ यावर इराणी चिडल्या, त्या म्हणाल्या, ”तुम्ही खोटं बोलत आहात. चुकीचं बोलत आहात.”
गुवाहाटी की फ़्लाइट में @smritiirani जी से सामना हुआ।
रसोई गैस की लगातार बढ़ती क़ीमतों पर सुनिए उनके जवाब 👇
महँगाई का ठीकरा,वे किन-किन चीज़ों पर फोड़ रहीं हैं !
जनता पूछे सवाल, स्मृति जी दें टाल !
वीडियो के अंशों में ज़रूर देखिये, मोदी सरकार की सच्चाई ! pic.twitter.com/fyV6ossGZm— Netta D’Souza (@dnetta) April 10, 2022
डिसुझांनी इरणी यांच्या परवानगीशिवाय हे संभाषण रेकॉर्डिंग करत होत्या. डिसुझा या घटनेचे शुटिंग करत असल्याचं बघून स्मृती इराणीही मोबाईल काढून शुटिंग करत असल्याचं दिसत आहे. त्यावर डिसुझा इराणींना म्हणतात, ‘तुम्ही महत्त्वाच्या पदावर आहात आणि लोकांना तुमच्याकडून उत्तर हवंय.’ त्याचवेळी इराणी म्हणाल्या, ”कोरोना काळात लोकांना मोफत लस दिली गेली,”
काँग्रेसच्या नेत्या नेत्ता डिसुझा (netta dsouza)आणि स्मृती इराणी या एकाच विमानातून प्रवास करीत असताना हा प्रकार घडला. डिसुझा यांनी इराणी यांना स्वयंपाकाच्या महागलेल्या गॅसदरवाढीवरुन प्रश्न विचारला. यावेळी दोघा नेत्यामध्ये शाब्दीक चकमक झाली.
हे सुध्दा वाचा:
राहुल गांधींच्या कुटुंबाने मणिपूरचा एटीएम म्हणून वापर केला; स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात
फ्लाइट में स्मृति ईरानी से कांग्रेस नेता की कहासुनी, पूछा- रसोई गैस इतनी महंगी क्यों?