28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
HomeराजकीयManohar Joshi : भिक्षुकी करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा संघर्षमय प्रवास

Manohar Joshi : भिक्षुकी करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा संघर्षमय प्रवास

शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मनोहर जोशी यांचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊ… वडील भिक्षुकी करत असल्यामुळे, त्यांच्यानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करत होते. अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत, प्रसंगी माधुकरी मागून मनोहर जोशींनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि ते शिक्षक झाले. जोशींचा जन्म यांचा जन्म 2  डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले.

त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपाई म्हणून नोकरी केली आणि शिक्षण करू लागले. किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. वयाच्या 27 व्या वर्षी मनोहर जोशी ते MA. LLB आणि शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला आरंभ केल

2 डिसेंबर 1961 रोजी त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा यामागचा त्यांचा उद्देश होता. 1967 मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले. शिवसेनेत आल्यानंतर मनोहर जोशींची कारकीर्द नावारूपाला आली. भिक्षुक ते महापौर हा त्यांचा प्रवास सुरुवातीला राहिला. बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत असत. युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जोशींनी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ही पदेही त्यांनी भुषवली.

…असे आले मनोहर जोशी शिवसेनेत!

कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले. मोठी पदं भूषवली. कोणताही राजकीय विचार नसताना, राजकारणात येण्याचा विचार नसताना ते शिवसेनेत आले. 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळखही नव्हती. 1967 च्या डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती. त्यावेळी श्रीकांत ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड करत असत. मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमवी केली आणि पुण्याला जाण्याची तयारी केली.

घरातली कार बाळासाहेब ठाकरे हे आधीच पुण्याला घेऊन गेले होते. आता रेकॉर्डिंगची सगळी तयारी बस किंवा ट्रेनमधून कशी नेणार? त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला. मनोहर जोशींनी कुठलेही आढेवेढे न घेता होकार दिला. मनोहर जोशी हे आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेंना घेऊन पुण्यात पोहचले. पुण्यातली सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट शनिवार वाडा परिसरात घडवून आणली. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मनोहर जोशी शिवसेनेत आले.

हेही वाचा : शिवसेनेचे कोहिनूर मनोहर जोशी यांचे निधन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी