28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रबैलगाडी शर्यतीतील 'गोल्डन मॅन' म्हणजे पंढरीशेठ, जाणून घ्या त्यांच्याविषयी ‘या’ खास गोष्टी

बैलगाडी शर्यतीतील ‘गोल्डन मॅन’ म्हणजे पंढरीशेठ, जाणून घ्या त्यांच्याविषयी ‘या’ खास गोष्टी

बैलगाडी शर्यतची आजही ग्रामीण भागात मोठी क्रेझ आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, बैलगाडी शर्यतीला ही ओळख मिळवून देण्यात सर्वात मोठा वाटा हा पंढरीशेठ यांचा आहे. 21 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास कार्यालयातून घरी जात असताना त्यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचं निधन झालं आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडी असोसिएशन, शर्यतीप्रेमींमध्ये समुदायावर शोककळा पसरली. पण हे पंढरीशेठ नेमके कोण होते, त्यांचा प्रवास कसा झाला, या सर्व बाबी आपण थोडक्यात जाणून घेऊया…

मूळचे पनवेलमधील विघघर गावचे पंढरीनाथ फडके हे रहिवासी होते. त्यांना बैलगाडी शर्यतीची खूप आवड होती. यापूर्वी पंढरीशेठ फडके  शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 1986 मध्ये बैलगाडी शर्यत सुरू झाली आणि त्यातून त्यांनी अमाप पैसे मिळवले. बैलगाडी शर्यतीतील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध असलेला ‘बादल’ नावाचा बैल त्यांच्याकडे आहे.

पंढरीनाथ फडके यांची ‘गोल्डन मॅन’ अशीही ओळख होती. कारण तब्बल एक किलो सोने ते परिधान करत असत. बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या बैलांसाठी, फडके शेंगदाणे, काजू, बदाम आणि पिस्ते देत असत. फडके यांनी आतापर्यंत सुमारे 40 ते 45 शर्यतीचे बैल सांभाळले. बैलगाडी शर्यतीच्या आखाड्यात त्याची धाडसी एन्ट्री, गाड्यावरून शर्यत पाहण्याची अनोखी शैली याचीच सगळीकडे चर्चा व्हायची.

बैलगाडी शर्यतींच्या क्षेत्रात पंढरीशेठ यांचा कट्टर विरोधक म्हणून राहुल पाटील यांची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला होते, त्या प्रकरणात फडकेंना अटक झाली होती. काही काळ त्यांची रवानगी ही तरुंगात करण्यात आली होती. पण अलीकडेच ते जामिनावर बाहेर आले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे समर्थक हे त्यांना अक्षरश: उचलून गाडीत बसवत होते.

बैलगाडी शर्यत हा खेळ नेमका कसा असतो?

बैलगाडी शर्यत नोव्हेंबरपासून मेपर्यंत चालते. महाराष्ट्रातील अलिबाग तालुक्यातील शेतकरी समुदायामध्ये लोकप्रिय आहे. स्थानिक बैल कला मालक आणि शेतकरी या शर्यतीचे आयोजन मुख्यतः त्यांच्या गावात करतात. आवास येथे वैकुंठ चतुर्दशी यात्रेत बैलगाडी मालक श्री नागेश्वराला नमस्कार करतात. बैलगाडी शर्यतीची महाराष्ट्रीय आवृत्ती बैलगाडा शर्यत म्हणून ओळखली जाते, ही कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची 450 वर्ष जुनी परंपरा आहे. चार आश्चर्यकारकपणे वेगवान बैल रेसिंग ट्रॅकवर 350-450 फूट अंतरापर्यंत कार्ट खेचतात आणि सर्वात जास्त वेग असलेला संघ विजेता मानला जातो.

हेही वाचा : नाशिक मनपाच्या घंटागाडी पार्कींगवर आता सीसीटीव्हींची नजर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी