30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमुंबई'संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर'

‘संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर’

संजय राऊत सीमा प्रश्नावर बोलत आहेत. मग त्यांचे सरकार सत्तेत असताना त्यांनी हा प्रश्न का सोडविला नाही, असा सवाल करतानाच संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर असल्याची टीका भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली. मुंबईत एका पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे वातावरण दोन्ही बाजूने तणावाचे होणार नाही याची काळजी घ्यायला दोन्ही बाजूने घ्यायला हवी. मात्र जर कर्नाटक ‘अरे’ करत असेल तर त्यांच्या ‘अरे’ ला महाराष्ट्र ‘कारे’ करेल. कर्नाटकने कुरघोडी केल्यास महाराष्ट्र भाजप आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत सीमा प्रश्नावर बोलत आहेत. मग त्यांचे सरकार सत्तेत असताना त्यांनी हा प्रश्न का सोडविला नाही, असा सवाल करतानाच संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर असल्याची टीका भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली. मुंबईत एका पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या महिला मुख्यमंत्री विधानाबाबत शेलार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांची घोषणा म्हणजे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हेच आहे. त्यामुळे या घोषणेतून त्याचे उत्तर सापडते अशी खोचक टीका देखील आशीष शेलार यांनी यावेळी केली.

राज्यपाल कोश्यारी, तसेच भाजपच्या काही नेत्यांनी यांनी शिवरायांबाबत कलेल्या वक्तव्यामुळे नाराज असलेले भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर आक्रोश मोर्चा काढला आहे. याबाबत आशीष शेलार यांना प्रश्न विचारला असता, आशीष शेलार म्हणाले, उदयनराजे हे आमचे राजे आहेत. उदयनराजे यांनी आंदोलन केले असेल तर आदोंलन करण्याचा त्यांचा अधिकारी आहे. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही असहमत आहोत असे देखील शेलार यावेळी म्हणाले. तसेच काही पक्ष याचा बाऊ करत असल्याचे देखील ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा
उदयनराजे भाजप नेत्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का ?
मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी!
जत तालुक्यातील 42 गावांना ‘म्हैसाळ’चे पाणी; कर्नाटकच्या कुरघोडीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी बांधकाम उद्योजक अजय आशर यांची नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान काँग्रेसने आशीष शेलार यांच्या विधानसभेतील जुन्या वक्तव्याचा देखील काँग्रेसने व्हायरल केली आहेत. यावर आशीष शेलार यांना प्रश्न विचारला असता आशीष शेलार य़ांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डोक्यावर पडले आहेत काय असा सवाल केला. ते म्हणाले तो प्रश्न त्यावेळी मी मविआ सरकारला विधानसभेत विचारला होता. तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे. मग उद्धव ठाकरे यांनी का क्लीनचीट दिली असा देखील सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच जुने व्हिडीओ काढले तर तुमची देखील गोची होईल हे काँग्रेसने लक्षात घ्यावे असा इशारा देखील शेलार यांनी दिला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!