30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या खमक्या भूमिकेचे केले कौतुक

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या खमक्या भूमिकेचे केले कौतुक

‘मरेन पण शरण जाणार नाही’ ही भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. संजय राऊत यांनी ठिणगी टाकली आहे. त्यामुळे मला त्यांचा सार्थ अभिमान आहे, अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
संजय माझा जुना मित्र आहे. तो लढवय्या शिवसैनिक आहे. मी आजच त्याची आई, वहिणी व मुलीला भेटून आलो आहे. संजयचा गुन्हा काय तर तो सत्ताधिशांच्या विरोधात बोलत होता. बोलणाऱ्यांच्या विरोधात भाजपकडून निघृण व घृणास्पद पद्धतीने सत्तेचा वापर केला जात असल्याचाही आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

जे. पी. नड्डा यांच्या विधानाचाही ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करूनच दाखवा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.तुम्हाला इतर पक्ष संपवायचे आहेत तर तुम्ही तुमचा विचार घेऊन जनतेमध्ये जा. पण बुद्धीबळाचा वापर करण्याऐवजी बळाचा वापर करून प्रादेशिक पक्ष संपविले जात आहेत. जनतेही याचा विचार करावा.पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत हे राजकारणी नव्हते. पण गरज पडली तेव्हा त्यांनी सत्तेच्या विरोधात आपली ठाम मते व्यक्त केली होती, याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. पण कधीही डोक्यात हवा जाऊ दिली नाही. कारण बाळासाहेब म्हणायचे की, सत्ता येते. सत्ता जाते. पण नम्रपणा विसरू नका. तुमचेही दिवस फिरतील. त्यावेळी तुमची अवस्था काय होईल, याचीही कल्पना करा, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या एका किस्स्याचाही उद्धव ठाकरे यांनी दाखला दिला. दुसरे महायुद्ध पेटले होते. हिटलर जोरात होता. तो विविध शहरांवर बॉम्बफेक करीत होतो. हिटलर हे महायुद्ध जिंकेल असे वाटत होते. त्या दरम्यान एक व्यंगचित्रकार हिटलवर सतत व्यंगचित्रे काढत होता. त्यावेळी या व्यंगचित्रकाराला पकडून आणा, असे आदेश हिटलरने दिले होते. आताही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना पकडून जबरदस्तीने शिक्षा दिली जात असल्याचे ठाकरे म्हणाले.

नितिन गडकरी म्हणाले त्या प्रमाणे राजकारण हे घृणास्पद झाले असल्याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले. एक दलाल म्हणाला होता की, आम्हाला आमदार – खासदार शोधावे लागतात. त्या दलालाला मी सांगू इच्छितो की, माझ्याबरोबर आहेत ते दमदार आणि वफादार आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारला आम्ही न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काहीही बोलणार नाही.

भाजपला काय करायचे आहे, हे भगतसिंग कोश्यारी यांच्या पोटातून ओटात आले होते. जे. पी. नड्डांचेही तसेच झाले आहे. भाजपला इतर राजकीय विरोधी पक्ष संपवायचे आहेत, व हुकुमशाही राबवायची असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा :

ईडीने देशातील नऊ राज्यांना धरले वेठिस

संजय राऊत यांच्यानंतर ईडीचा रोख उद्धव ठाकरेंकडे? निलेश राणे यांचे मोठे विधान

उध्दव ठाकरेंनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!