36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रGST Collection 2022 : महाराष्ट्राच्या जीएसटीने केंद्र झाले मालामाल

GST Collection 2022 : महाराष्ट्राच्या जीएसटीने केंद्र झाले मालामाल

या वर्षी तरी महाराष्ट्राने भरलेल्या जीएसटीचा परतावा वेळेवर मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दर वर्षी प्रमाणे महाराष्ट्राने जीएसटी वेळेवर भरला असून, त्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेने दोन पटींहून अधिक आहे. त्यामुळे केंद्राच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. या वर्षी देखील महाराष्ट्र जीएसटीमध्ये अग्रेसर आहे.

महाराष्ट्राने 22 हजार कोटींचा जीएसटी भरला आहे. त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. कर्नाटकने 9 हजार कोटींचे जीएसटी दिले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. त्यानंतर गुजरातचा नंबर लागतो. जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या मदतीने एकूण 1.49 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा आले. जीएसटी संकलनातून यापूर्वी जूनमध्ये 1.44 लाख कोटी, मे महिन्यात 1.40 लाख कोटी, एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी आणि मार्चमध्ये 1.42 लाख कोटींची जमा करण्यात आले. जुलैमध्ये जीएसटी संकलनात 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्ट्राचे जुलै महिन्यातील कर संकलन 22,129 कोटी रुपये होते. तेच जून महिन्यात 18,899 कोटी रुपये होते.

जीएसटी संकलनात राज्याने 17 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे. गुजरातमध्ये जुलै महिन्यात 9,183 कोटींचे कर संकलन झाले, जून महिन्यात कर संकलनाचा आकडा 7,629 कोटी रुपये होता. कर संकलनात गुजरातने 20 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. तामिळनाडू राज्याने जुलै महिन्यात 8,449 कोटी तर जूनमध्ये 6,302 कोटी रुपये, उत्तरप्रदेशाने जुलै महिन्यात 7,074 कोटी तर जून महिन्यात 6,011 कोटी रुपये देशाच्या तिजोरीत जमा केले आहे.

या सगळया राज्यांचा विचार करता महाराष्ट्रा इतका जीएसटी इतर कोणत्याही राज्यांनी भरला नाही. इतर राज्याचे कर संकलन या राज्यांच्या दुप्पटीहून अधिक आहे. तरीही जीएसटीचा परतावा मिळण्यासाठी राज्याला संघर्ष करावा लागतो. आता महाराष्ट्रात भाजपधार्जीणे सरकार आले आहे. त्यामुळे हा परतावा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये अशी अपेक्षा सर्वांना आहे.

हे सुद्धा वाचा :

ईडीने देशातील नऊ राज्यांना धरले वेठिस

वाचा : संजय राऊत यांच्या अटकेचा घटनाक्रम

नितीन गडकरींप्रमाणे रोहित पवारांनाही वाटतेय ‘राजकारण सोडावे’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी