30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्यानंतर ईडीचा रोख उद्धव ठाकरेंकडे? निलेश राणे यांचे मोठे विधान

संजय राऊत यांच्यानंतर ईडीचा रोख उद्धव ठाकरेंकडे? निलेश राणे यांचे मोठे विधान

टीम लय भारी

कणकवली : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने काल रात्री संजय राऊत यांना अटक केली. या अटकेनंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या अटकेनंतर भाजप आणि शिंदे गट खिल्ली उडवत आनंदोत्सव साजरा करीत आहे तर शिवसेनेच्या गोटात तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी सुद्धा त्यांचे मत सोशल मीडियावर व्यक्त करून पुढचा नंबर त्यांचा असू शकतो असे सूचक वक्तव्य करून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना इशाराच दिला आहे.

कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारे भाजप नेते निलेश राणे संजय राऊत यांच्या अटकेनंतर सुद्धा शिवसेनेवर टीका करत असल्याचे दिसून आले. यावेळी सोशल मीडियावर पोस्ट करून राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे ट्विटमध्ये लिहितात, दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असे म्हणून त्यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दोनदा चौकशीसाठी समन्स पाठवून सुद्दा शिवसेना नेते संजय राऊत यांनी अधिवेशनचे कारण देत जाणे टाळले त्यामुळे ईडी काल थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आणि काल उशीरा रात्री त्यांनी अटक करण्यात आली. यावेळी राऊत घरातून बाहेर पडत असताना त्यांचे कुटुंबीय अत्यंत भावूक झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. संजय राऊत यांच्या मातोश्रींना यावेळी अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले, त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांचे औक्षण केलं आणि राऊतांनीही आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. हाच मुद्दा उपस्थित करीत निलेश राणे यांनी राऊत यांना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : राऊतांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा आनंद गगनात मावेना…

शिवसेना संपणार, फक्त भाजप राहणार; जे. पी. नड्डांचा दावा

नितीन गडकरींप्रमाणे रोहित पवारांनाही वाटतेय ‘राजकारण सोडावे’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!