32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे यांनी विधान भवनाला घेराव घातला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

उद्धव ठाकरे यांनी विधान भवनाला घेराव घातला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

महाराष्ट्राच्या सत्तासघर्षाचा निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच राजकीय पक्षाचा व्हिपलाच कोर्टाने यावेळी योग्य ठवरल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालावर आज अकोल्यात प्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रीया देताना उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उद्धव ठाकरे यांना मोठे हत्यार मिळाले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी असे सांगतानाच ज्यावेळी गोंधळला माणूस असतो, त्यावेळी खरी सल्ल्याची गरज असते असे आंबेडकर म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेसाठी उद्धव ठाकरे यांनी आक्रमक व्हावे असा सल्ला देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांनी इतर पक्षांसोबत चर्चा करावी त्यांना सोबत घ्यावे आणि विधान भवनाला घेराव घातला पाहिजे. एका महिन्यात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय घेण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली पाहिजे असे आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच 16 आमदार अपात्र ठरले तर पुढे 24 आमदारांवर देखील अपात्रतेची कारवाई होऊ शकते असे ते यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

2024 नंतर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात; आतापर्यंत काँग्रेसमधील चौकडीमुळे त्यांचे नाव मागे पडले : यशवंतराव गडाख

आर्यन खानप्रकरणात समीर वानखेडे गोत्यात; सीबीआयने केला भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

श्वेता तिवारीचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ; म्हणाले मुलीपेक्षा तूच सुंदर

उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षांसोबत बोलून म्हणजेच चर्चा करून त्यांना सोबत घ्यायला हवे. अन् विधान भवनाला घेराव घातला पाहिजे. येत्या एका महिन्यात हा निर्णय घ्यावा, अशी मागणी घातली पाहिजे. जर 16 आमदार अपात्र झाल्यास पुढे 24 आमदारांवर कारवाई होऊ शकते. अशी शक्यता आंबेडकर यांनी वर्तवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी