28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयउत्तर प्रदेश निवडणुकीसाठी वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा

टीम लय भारी

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने समाजवादी पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. दादर आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे(Vanchit Bahujan Aaghadi supports Samajwadi Party in Uttar Pradesh).

अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मानवतावादी, सेक्युलरवादी, आंबेडकरवादी मतदारांनी समाजवादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकरांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, ‘आरएसएस-बिजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इनकम टॅक्स, आणि सीआयडी सारख्या एजन्सीचा वापर करून विरोधी पक्ष खिळखिळा करू पाहत आहे.’

आंबेडकर पुढे म्हणाले, ‘भाजपाला येत्या २०२४ मध्ये स्वतःचा मार्ग मोकळा करून देशाचे संविधान बदलण्याचे राजकारण सुरु करायचे आहे. या पक्षांचा केंद्रात जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेश मधून जातो. पण आताच्या परिस्थितीमध्ये बसपा किंवा चंद्रशेखर आझाद हे बीजेपीला टक्कर देऊ शकतील असे वाटत नाही. त्यामुळे सध्या समाजवादी पक्ष विरुद्ध आरएसएस अशी परिस्थिती आहे म्हणून असा निर्णय घेतला आहे. आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा.’

हे सुद्धा वाचा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘युती’ची घोषणा केली..

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

कन्हैया कुमारवर फेकली शाई, पक्षाच्या नेत्यांनी ‘अॅसिड’ असल्याचा केला दावा

Uttar Pradesh elections: Rampur’s fierce battle centres around Samajwadi Party’s Azam Khan

‘आंबेडकरवादी मतदाराचे स्वतंत्र अस्तित्व आहे. एका निवडणुकीमध्ये बायपास दिला तर फरक पडत नाही असे आम्ही मानतो. आपण स्वतःचे अस्तित्व हे निवडणुकीनंतर देखील सुरुवात करता येईल. मानवतावादी, सेक्युलरवादी, आंबेडकरवादी मतदारांनी समाजवादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,’ असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

तत्पूर्वी आरएसएस आणि बीजेपी वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती अथवा पाठिंबा देण्यास सहमती असल्याचे आंबेडकर यांनी विशेषतः नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी