33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeराजकीयआपली ताकद बघा आणि मग जागा बघा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत...

आपली ताकद बघा आणि मग जागा बघा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत आहेत

 

मुंबई,(प्रशांत चुयेकर)
भाजपच्या विरोधात मोठी ताकद उभा करण्यासाठी देशात इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात ही हाच फॉर्मुला घेत महाविकास आघाडीच्यावतीने भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पूर्वी इतक्याच लोकसभेच्या जागा मागणं योग्य आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पक्षाची बरीच हानी झालेली आहे. प्रमुख पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे भाजपला जाऊन मिळाल्याने आता आपल्याजवळ काय आहे. फुटलेल्या पक्षात किती लोक आहेत हे बघूनच जागा वाटप करावे, असे प्रकाश आंबेडकर यांना वाटते.

अंनत- राधिका यांच्या प्रीवेडिंगला कलाकारांसोबत कोण आलंय?
वंचितने स्वतःच्या बळावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 41 लाख 32000 पेक्षा अधिकि मतदान त्यांनी घेतलेलं आहे.औरंगाबाद एक अकोला दोन तर 41 लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानी वंचितन मते घेतले आहेत.
विधानसभा निवडणुकीत 24 लाखापेक्षा अधिक मतदान त्यांनी घेतलेला आहे.दहा मतदारसंघात दोन नंबरला त्यांचे उमेदवार आहेत.काही मतदारसंघात तिसऱ्या ठिकाणी उमेदवार आहेत.
स्वतःच्या जीवावर हा प्रयोग त्यांनी पूर्ण केला आहे त्यामुळे साहजिकच आता आपल्याला त्या मतानुसार जागा हव्यात त्यानुसार जागावाटप व्हावे अशी ही मागणी आंबेडकर करत आहेत.

प्रकाश झा करणार दिग्दर्शन? द बीग बी आता नव्या भूमिकेत
कोणाकडे किती लोक आहेत असं बघूनच लोकसभेच्या जागावाटप करावं असेही प्रकाश आंबेडकर यांना वाटते.दोन वेळच्या निवडणुकीत त्यांनी मताधिक्य अधिक घेतल्या कारणाने त्यांचा दावा करणे हे बरोबर असल्याचेही कार्यकर्त्यांच्या मधून बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी