28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रअंनत- राधिका यांच्या प्रीवेडिंगला कलाकारांसोबत कोण आलंय?

अंनत- राधिका यांच्या प्रीवेडिंगला कलाकारांसोबत कोण आलंय?

कार्यक्रमासाठी कलाकारांसोबत आता राजकीय नेत्यांनी सुद्धा जामनगरला उपस्थिती दाखवली कोण आलय पाहुया

जगातील पहिल्या १० श्रीमंताच्या यादीमध्ये नाव येणारे रिलायन्सचे मालक यांच्या धाकट्या मुलगा अंनत अंबानी यांचे प्रीवेडिंग फंक्शन हे गुजरातमधील जामनगर मध्ये १ ते ३ मार्च पर्यत आहे. त्या कार्यक्रमासाठी कलाकारांसोबत आता राजकीय नेत्यांनी सुद्धा जामनगरला उपस्थिती दाखवली कोण आलय पाहुया

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमात सामील झाले आहेत. लाखो दिलोकी धडकन माधुरी दिक्षित ही देखील जामनगरमध्ये उपस्थित आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी गेल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्या.

सई ताम्हणकर आता इथे झळकणार

बॉलिवूडमधील अनेक कलाकार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी पोहोचले आहेत. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, ऑरी, दिग्दर्शक अॅटली, गायक रिहाना, राणी मुखर्जी, अर्जुन कपूक, शाहरुख खान हे कलाकार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरला गेले आहेत. करीना कपुर आणि तिची दोन मुलं देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे.

बारामतीच्या मेळाव्याबाबत काय म्हणाले संजय राऊत

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला ‘अन्न सेवा’ कार्यक्रमानं सुरुवात झाली. हा कार्यक्रम जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात झाला. जिथे मुकेश अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चंट आणि अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी गावकऱ्यांना गुजराती जेवण दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी