31 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
Homeमहाराष्ट्र‘कोरोना’च्या काळातही सुभाष देसाईंचे काम कौतुकास्पद, उद्योजकांकडून पोचपावती

‘कोरोना’च्या काळातही सुभाष देसाईंचे काम कौतुकास्पद, उद्योजकांकडून पोचपावती

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या काळात राज्यातील उद्योग क्षेत्र ठप्प झाले होते. आर्थिक चक्र थांबले होते. पण या संकटातही मार्ग काढून उद्योग पुन्हा सुरू करण्यात राज्य सरकारने मोठे निर्णय घेतले. त्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मोठे कष्ट घेतले होते. त्याबाबत उद्योजकांनी देसाई यांची प्रशंसा केली आहे ( Subhash Desai done commendable work for industry).

‘कोरोना’च्या काळातही सुभाष देसाईंचे काम कौतुकास्पद, उद्योजकांकडून पोचपावती

राज्यात उद्योग वाढावा यासाठी सुभाष देसाई नेहमीच सकारात्मक असतात. अडचणी व समस्या दूर करून ते उद्योगांना चालना देतात. ‘कोरोना’च्या संकटातही त्यांनी उत्कृष्ट काम केल्याची भावना ‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर’चे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी व्यक्त केली ( Subhash Desai is always positive for industry development ).

आयात – निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी चेंबरने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सेवेस सुरुवात केली आहे ( Maharashtra Chambers of commerce, Industry and agriculture has started ‘Certificate of origin facility). या उपक्रमाचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. त्यावेळी मंडलेचा व पेडणेकर यांनी या भावना व्यक्त केल्या.

Mahavikas Aghadi

‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजीन’ची सुविधा चेंबरने सुरू केली. पण या सुविधेचा फायदा राज्य सरकारच्या ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ला होईल, असे सुभाष देसाई म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी डिजिटल स्वरुपात ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ची सुविधा देणारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर ही राज्यातील पहिली औद्योगिक संघटना आहे. या माध्यमातून महाराष्ट्र चेंबरने डिजिटल क्षेत्रात दमदार पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

हे सुद्धा वाचा

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

सहकार मंत्र्यांनी बँकांवर उगारला आसूड, शेतकऱ्यांना नाडणाऱ्या बँकांविरोधात कारवाईचे निर्देश

धनंजय मुंडे पाच तास अडकले ‘ट्राफिक’मध्ये, पावसाचा फटका

पीडबल्यूडीच्या सचिवपदाची जबाबदारी उल्हास देबडवार यांच्याकडे

‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत हा मोठा विजय आहे. या सुविधेमुळे वेळ, पैसा व श्रम वाचणार असून कार्यक्षमता वाढणार आहे. जन्माच्या दाखल्याप्रमाणे आयात – निर्यात क्षेत्रासाठी ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ महत्वाची भूमिका निभावणार आहे.

‘कोरोना’ महामारीमुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ नुसार अर्थचक्र फिरले पाहिजे, त्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले. महापरवाना, महाजॉब, उद्योगमित्र, नवीन औद्योगिक क्षेत्राची निर्मिती आदी उपक्रम हाती घेतले आहेत. देश-विदेशी गुंतवणूक वाढीसाठी अनेक कंपन्यांसोबत सामजंस्य करार केले आहेत, असे देसाई म्हणाले.

कोरोना काळात महाराष्ट्र चेंबर्सने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार – उद्योग सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन सेमिनार, चर्चासत्र घेतले. याच पार्श्वभूमीवर उद्योगांना नव्याने उपरोक्त सुविधा सुरू केली आहे. व्यापार उद्योग वाढवण्यासाठी चेंबर्स नेहमीच शासनासोबत कार्यरत राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.

या सुविधेमुळे राज्यातील कुठल्याही भागातून उद्योगांना सहजरित्या सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन घेता येईल. परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारची भूमिका नेहमीच सहकार्याची असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे नेहमीच सहकार्य करत असतात व व्यापार उद्योग वाढीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी चेंबरला सहकार्य करतात असे आशिष पेडणेकर म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी