33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालयसहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

टीम लय भारी

मुंबई : सहकार विभागात बदल्यांचा बाजार भरला आहे. त्यानुसार पहिला सौदा आज पूर्ण झाला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बदल्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानुसार उपनिबंधक संवर्गातील तब्बल 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ( Balasaheb Patil ordered 21 officers transfers).

Mahavikas Aghadi

बदल्या करण्याबाबत 10 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. त्यानुसार बाळासाहेब पाटील यांनी तीन दिवस अगोदरच बदल्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु या बदल्यांच्या मागे मोठे अर्थकारण असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात रंगली आहे. खोकी आणि पेटी या निकषांनुसार बदल्या केल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा 

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष देशमुखांकडे

सहकार मंत्र्यांनी बँकांवर उगारला आसूड, शेतकऱ्यांना नाडणाऱ्या बँकांविरोधात कारवाईचे निर्देश

मंत्रालयातील ‘या’ IAS अधिकाऱ्याने ‘कोरोना’च्या लढाईत उपसले प्रचंड कष्ट, आता झाली बदली

आमदार रोहित पवारांचा कमालीचा विनम्रपणा, मंत्रालयात चक्क व्हरांड्यात बसले

मंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

Balasaheb Patil

Balasaheb Patil
बाळासाहेब पाटील यांनी बदल्यांची पहिली यादी जाहीर केली आहे

सहकार विभागातील बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

एस. एम. स्वामी, ज्योती शंखपाल, सी. व्ही. टिकुळे, के. ए. सोनावणे, मधुकांत गरड, साधना देशमुख, आर. जी. गायकवाड, एस. टी. गोंदे, शिरीष सकपाळ, संगमेश्वर बदनाळे, राजेंद्र पालेकर, आर. आर. महाजन, बी. एस. कटरे, एस. एम. पाटील, पी. आर. फडणीस, एस. एल. बोराडे, आर. एस. खंडाईत, एस. पी. मैत्रेवार, एस. एन. देशकर, व्ही. डी. कहाळेकर, एन. पी. काळे.

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

विशेष म्हणजे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे नवखे आहेत. मंत्रीपदाची सूत्रे त्यांनी पहिल्यांदाच हाती घेतली आहेत. परंतु बदल्या करताना मात्र त्यांनी चांगली हुशारी दाखविली आहे. त्यांच्या कार्यालयात सहकार विभागातील खास ‘तज्ज्ञ’ अधिकारी नियुक्त केलेले आहेत. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मंत्री पाटील यांनी अत्यंत पद्धतशीरपणे बदल्या केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी