टीम लय भारी
मुंबई : क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ या दोघांनी एकत्र येत एक मजेशीर व्हिडिओ बनवला आहे. या दोघांनी 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ बाजीगर ‘चित्रपटातील एक सीन पुन्हा तयार केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला एका दिवसात 2.6 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे (Suryakumar and Prithvi repeat the comedy scene from the movie ‘Baajigar’).
या व्हिडिओमध्ये ते दोघे जॉनी लिव्हर आणि दिनेश हिंगू यांचा समावेश असलेला एक कॉमेडी सीन करताना दिसत आहेत. चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर दिनेश हींगू यांच्यासाठी चहा घेऊन येतो परंतु जॉनी त्यामध्ये चहा पत्ती टाकायला विसरतो. त्यावेळी दिनेश हिंगू चहाचा कप हातात घेत जॉनी लिव्हरकडे पाहात हसताना दिसत आहेत. त्याचबरोबर जॉनीला आपली चूक लक्षात आल्याने तो ही हिंगू यांच्याबरोबर हसताना दिसत आहेत.
भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट बनल्या होमाई व्यारावाला
सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘मौलिक’ सल्ला
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार याने दिनेश हिंगू यांची नक्कल केली आहे, तर पृथ्वीने जॉनी लिव्हरची नक्कल केली आहे. सूर्यकुमारने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका दिवसात या व्हिडिओला लाखांहून अधिक माणसांनी पाहिले आहे (Suryakumar has shared this video on other Instagram accounts).
या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर टिपण्या केल्या आहेत. या टीपण्यांमध्ये कृणाल पंड्या आणि यशस्वी जैस्वाल यांनीही हसऱ्या चेहऱ्याचे ईमोजी टाकले आहेत. आतापर्यंत 6000 हून अधिक जणांनी मजेशीर टिपण्या या व्हिडिओवर केल्या आहेत. या आधीही या दोघांनी अंदाज अपना अपना या चित्रपटातील एक सीन पुन्हा तयार केला होता.
मुस्लीम बांधव ‘मोहरम’ का साजरा करतात ? जाणून घ्या कारण
“Counting My Blessings”: Suryakumar Yadav And Prithvi Shaw Depart For England To Join India Squad
सध्या सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे इंग्लंड येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यांसाठी रवाना झाले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि अवेश खान खेळातून बाहेर असून सूर्यकुमार आणि पृथ्वी यांनी त्यांची जागा घेतली आहे.