25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकीयनितीन गडकरींना दाऊदची धमकी

नितीन गडकरींना दाऊदची धमकी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood ibrahim kaskar) याच्या हस्तकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण दाऊदचा हस्तक असल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस आणि जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Dawood threatens Nitin Gadkari)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. आपण दाऊद इब्राहिमचे हस्तक असल्याचे सांगून त्याने गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि खंडणी मागितली. त्यानंतर काही सेकंदातच त्या व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले. हा फोन उचलणाऱ्या कार्यकर्त्याने लगेच याबाबतची माहिती पक्षातील वरिष्ठांना दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. याची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे दावोसमध्ये जाऊन ठाकरेंवर करणार मात !

कामाची बातमी : घरमालकांना मोठा दिलासा अन् भाडेकरूंची कटकटीतून मुक्तता

Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !

नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानावर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातून विविध तर्कवितरकांना उधाण आले आहे.
नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथक सज्ज ठेवण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी पुढे सांगितले.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी